Sarkari Naukri: सरकारी नोकरी शोधत असलेल्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता परीक्षा न देता गृह मंत्रालयात (Ministry of Home Affairs) नोकरीची संधी मिळणार आहे. यासाठी गृह मंत्रालयानं असिस्टंट, स्टेनोग्राफर ग्रेड-I आणि अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. गृह मंत्रालय भर्ती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, निवडलेला उमेदवार देशात कुठेही काम करेल. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट mha.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
दरम्यान, या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 40 पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवार 2 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी एमएचए भरतीसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी प्रथम दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे.
गृह मंत्रालयात कोणत्या पदांसाठी भरती होणार?
सहाय्यक- 07 पदे
स्टेनोग्राफर ग्रेड-I-24 पदे
अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) – 09 पदे
निवड झाल्यावर किती मिळणार वेतन?
सहाय्यक- निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल-6 अंतर्गत रुपये 35,400 ते 112400 रुपये दिले जातील.
अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) – निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल – 4 द्वारे रुपये 25500 ते रुपये 81100 पर्यंत वेतन दिले जाईल.
स्टेनोग्राफर ग्रेड-I- निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल – 6 द्वारे 35400 रुपये ते 112400 रुपये वेतन दिले जाईल.
गृह मंत्रालयाकडे अर्ज करण्याची पात्रता
उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच संगणक कार्यक्षमता चाचणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय, अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेल्या सर्व संबंधित पात्रता उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे. अर्जाची लिंक पाहण्यासाठी MHA Recruitment 2024 Notification यावर क्लिक करा. तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. गृह मंत्रालय भर्ती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता आणि योग्यरित्या भरलेला अर्ज संबंधित कागदपत्रांसह एसपी (प्रशासक), NIA मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-110003 येथे पाठवू शकता. गृह मंत्रालय भर्ती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, निवडलेला उमेदवार देशात कुठेही काम करेल. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट mha.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. या पदांसाठी चांगले वेतनही देण्यात येणार आहे. त्यामुळं सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांना ही चांगली संधी आहे.
महत्वाच्या बातम्या:
Job Majha: हॉस्पिटॅलिटी, पर्यटन क्षेत्रामुळे येत्या काळात 5 कोटी रोजगार निर्माण होण्याची शक्यता