Ashwini Mahangade on Farmer Protest :  दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी (Farmer Protest) पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं आहे. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांसाठी एका वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर ते कायदे मागे घेण्याचा निर्णयही सरकारने घेतला होता. पण आता पुन्हा एकदा  एमएसपीबाबत कायदा करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण प्रतिक्रिया देत आहे. अभिनेत्री अश्विनी महागंडे (Ashwini Mahangade) हीने देखील निषेध व्यक्त केलाय. 


'आता कोणत्या तोंडाने म्हणाल जय जवान जय किसान', असं म्हणत अश्विनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला आहे. अश्विनी ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तसेच ती तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चालू घडामोडींवर देखील भाष्य करते. त्यातच आता दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी मोर्चावर देखील अश्विनीने भाष्य केलं आहे. 


अश्विनीच्या पोस्टने वेधलं लक्ष


किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करण्याची प्रमुख मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्तर भारतातील अनेक शेतकरी दिल्लीच्या सीमेवर एकवटले आहेत. या शेतकरी मोर्चाला दिल्या जाणाऱ्या वागणूकीबद्दल अश्विनीने भाष्य केलं असून त्यावर संतप्त प्रतिक्रिया देखील दिली आहे. तिच्या या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. 


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही अश्विनीचं भाष्य


मागील अनेक महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरु लागलाय. यावर देखील मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे हीने भाष्य केलं होतं.मराठे कधीच कोणाच्या हक्काचे खाणारे नाहीत. त्यांना हक्काचं आरक्षण हवं आहे. आम्हाला दुसरं कोणाचं आरक्षण नको आहे. किंवा त्यांच्यातला वाटा नको आहे. आम्हाला आमचं स्वतंत्र आरक्षण द्या. म्हणजे मेहनत घेणाऱ्या आमच्या मुलांना यश मिळेल. आरक्षण ही खरचं काळाची आणि मराठा मुलाची आणि मुलीची गरज आहे आणि ते व्हायला हवं असं मत अश्विनी महांगडेने मांडलं होतं. 


अश्विनी सध्या काय करते?


अभिनेत्री अश्विनी महांगडे ही सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते मालिकेत अनघा ही व्यक्तीरेखा निभावत आहे. तसेच ती लवकरच धर्मरक्षक आहिल्यादेवी होळकर या चित्रपटात देखील झळकरणार आहे. 


ही बातमी वाचा : 


Prathamesh Parab Engagement : 'व्हॅलेंटाईन्स डे'चा मुहूर्त साधत दगडूच्या नव्या आयुष्याची सुरुवात, अभिनेता प्रमेथश परबचा साखरपुडा संपन्न