IPO : एथनिक वेअर ब्रँड 'मान्यवर'  आयपीओ बाजारात दाखल होत आहे. मान्यवर ब्रँडची मालकी असलेल्या वेदांत फॅशन्स लिमिटेडची इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) 4 फेब्रुवारी रोजी खुली होणार असून 18 फेब्रुवारीपर्यंत बोली लावता येणार आहे. वेदांत फॅशन लिमिटेडला 18 जानेवारीला आयपीओ आणण्यासाठी सेबीने मान्यता दिली होती. त्यानंतर कंपनी आता आपला आयपीओ बाजारात आणणार आहे.


वेदांत फॅशन 16 फेब्रुवारी रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टिंग होण्याची योजना आहे. कंपनी पुढील काही दिवसांत शेअर्सची किंमत म्हणजेच प्राइस बँड जाहीर करेल. वेदांत फॅशनने सप्टेंबर 2021 मध्ये सेबीकडे आयपीओसाठीची मसुदा कागदपत्रे सादर केली होती.


वेदांत फॅशनच्या आयपीओ अंतर्गत कोणतेही नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत आणि सर्व शेअर्स विक्रीसाठी ऑफर फॉर सेल असतील. या अंतर्गत कंपनीचे विद्यमान प्रवर्तक आणि शेअरहोल्डर्स त्यांचे सुमारे 3.636 कोटी शेअर्स विक्रीसाठी ठेवतील.


ऑफर-फॉर-सेल (OFS) मध्ये, 1.746 कोटी शेअर्स राइन होल्डिंग्स लिमिटेड, केदारा कॅपिटल अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंडचे सुमारे 7,23,000 शेअर्स आणि रवी मोदी फॅमिली ट्रस्टचे 1.818 कोटी शेअर्स विक्रीसाठी ठेवले जातील.


सध्या वेदांत फॅशनमध्ये राईन होल्डिंग्सचा 7.2 टक्के हिस्सा आहे. केदारा AIF कडे 0.3 टक्के हिस्सा आहे. तर 74.67 टक्के हिस्सा रवी मोदी फॅमिली ट्रस्टकडे आहे.


अॅक्सिस कॅपिटल, एडलवाइज फायनान्शियल सर्व्हिसेस, ICICI सिक्युरिटीज, IIFL सिक्युरिटीज आणि कोटक महिंद्रा कॅपिटल हे इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.


वेदांत फॅशन पुरुषांच्या एथनिक वेअर सेगमेंटच्‍या व्‍यवसायात गुंतलेली आहे. त्याचा फ्लॅगशिप ब्रँड 'मान्यवर' संपूर्ण भारतात आहे आणि भारतीय वेडिंग आणि सेलिब्रेशन वेअर विभागातील मार्केट लीडर आहे. याशिवाय वेंडात फॅशनमध्ये त्वामेव, मंथन, मोहे आणि मेबाज सारखे ब्रँड देखील आहेत.


महत्वाच्या बातम्या