Share Market Opening :  शेअर बाजारात सोमवारी झालेली घसरण मंगळवारीदेखील कायम राहिली. शेअर बाजार सुरू होताच काही मिनिटांमध्ये सेनसेक्स 800 हून अधिक अंकांनी कोसळला. जागतिक शेअर बाजारात सुरू असलेल्या पडझडीचा परिणाम देशातील शेअर बाजारावर दिसून आला. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शेअर बाजार काही प्रमाणात सावरत असल्याचे चित्र होते. 


आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू होताच काही मिनिटातच बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्स सुरू होताच काही वेळेतच 882 अंकांनी घसरला. निफ्टीदेखील 17,000 अंकांवर सुरू झाला. मात्र, व्यवहार सुरू होताच 17 हजार अंकाखाली निफ्टीची घसरण झाली. 


शेअर बाजार सुरू होताच 15 मिनिटानंतर सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास 167.80 अंकांनी म्हणजे जवळपास 0.98 टक्के घसरण दिसून आली. त्यानंतर निफ्टीमध्ये एक टक्क्यांची घसरण दिसून आली. 


 





प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजार


बाजार सुरू होण्याआधी प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स 335.5 अंकांनी म्हणजे 0.58 टक्क्यांची घसरण झाली. निफ्टीदेखील 17 हजार अंकाखाली आला होता. 


सोमवारीदेखील घसरण


सोमवारी सेन्सेक्समध्ये 1545.67 अंकांची घसरण दिसून आली. तर, निफ्टी 468.05 अंकाची घसरण झाली होती.


10 लाख कोटींचे नुकसान 


सोमवारी शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणुकदारांचे तब्बल 10 लाख कोटींचे नुकसान झाले. मागील पाच दिवसातील घसरणीमुळे शेअर बाजारातील गुंतवणुकदारांचे 18 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याज दर वाढीचे दिलेले संकेत, रशिया-युक्रेन सीमेवर असलेला तणाव या कारणांमुळे जागतिक शेअर बाजारात घसरण सुरू असल्याचे म्हटले जात आहे. भारतीय शेअर बाजारातून परदेशी गुंतवणुकदारांनी मोठ्या प्रमाणावर शेअर्सची विक्री केली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: