नवी दिल्ली : दिल्लीतून चार कोटी रुपये किंमतीची क्रिप्टोकरन्सी चोरीला गेल्याच्या घटनेचा तपास उघड झाला आहे. इस्त्रायलविरोधात काम करणाऱ्या हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेने हे पैसे चोरले असल्याचं दिल्ली सायबर पोलिसांच्या तपासात उघडकीस आलं आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांनी या गोष्टीची तब्बल पाच महिने गुप्तपणे तपास केला आहे.
दिल्लीच्या एका उद्योगपतीच्या क्रिप्टो अकाऊंटवरुन 30 लाख रुपयांची क्रिप्टोकरन्सी चोरीला गेल्याची घटना घडली होती. 2019 साली यासंबंधी दिल्ली पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. अवैध पद्धतीने ही रक्कम दुसऱ्याच अकाऊंटवर ट्रान्सफर झाल्याचं या तक्रारीत म्हटलं होतं. नंतर ही केस दिल्ली पोलिसांच्या सायबर विभागाकडे ट्रान्सफर करण्यात आली.
त्यावर अधिक तपास केला असता इस्त्रायलविरोधात काम करणाऱ्या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने ही रक्कम चोरल्याचं उघडकीस आलं. सध्या या क्रिप्टोकरन्सीची किंमत ही चार कोटी रुपये इतकी आहे.
ही रक्कम नंतर अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित तीन अकाऊंट्समध्ये ट्रान्सफर केल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर या अकाऊंट्सवरून वेगवेगळ्या दहशतवादी संघटना आणि व्यक्तीच्या अकाऊंट्सवर ही रक्कम हस्तांतरित करण्यता आली. या संबंधी ब्लॉक चेन टेक्नॉलॉजीचा संपूर्ण तपास झाला असल्याचं दिल्लीच्या सायबर सेलने माहिती दिली आहे.
आता या पैशाचा वापर दहशतवादासाठी केला जाणार आहे हे स्पष्ट आहे. अल कायदा ही दहशतवादी संघटना भारतातही कार्यरत असून भारतात या संघटनेने अनेक दहशतवादी कारवाया केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Bitcoin, Dogecoin, Ether यासह अनेक बड्या क्रिप्टोकरन्सीच्या किंमती पडल्या, जाणून घ्या आजच्या किंमती
- 2017 मध्ये सुरू केली क्रिप्टो एक्सचेंज कंपनी, आता आहे अंबानी आणि अदानींपेक्षा श्रीमंत
- Cryptocurrency Fraud : भारतामध्ये 1200 कोटींचा क्रिप्टो घोटाळा, 900 लोकांची फसवणूक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha