Vedant Fashions Shares Listing: बाजारपेठेत 'मान्यवर' (Manyavar)या ब्रॅण्डने पारंपरीक कपडे तयार करणाऱ्या वेदांत फॅशन लिमिटेड या कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात लिस्ट झाला आहे. आयपीओमध्ये प्रति शेअर 866 रुपये असणारा हा शेअर बाजारात 8 टक्क्यांच्या प्रीमियम दराने सूचीबद्ध झाला. या वर्षी शेअर बाजारात लिस्ट झालेला हा तिसरा आयपीओ आहे. 


किती रुपयांवर बाजारात लिस्टिंग? 


वेदांत फॅशन लिमिटेडचा शेअर बीएसईवर 936 रुपयांवर लिस्ट झाला. तर, एनएसईवर 935 रुपये प्रति शेअर या दरावर सूचीबद्ध झाला. सध्या शेअर बाजारात असणारी अस्थिरता पाहता ही समाधानकारक लिस्टिंग असल्याचे म्हटले जात आहे. 


आयपीओ कधी आला होता?


वेदांत फॅशन लिमिटेडचा आयपीओ 4 फेब्रुवारी 2022 रोजी शेअर बाजारात आला होता. 8 फेब्रुवारी 2022 पर्यंत गुंतवणूकदारांना आयपीओसाठी अर्ज करण्याची मुदत होती. 


ऑफर फॉर सेल आयपीओ


वेदांत फॅशनच्या आयपीओ अंतर्गत कोणतेही नवीन शेअर्स जारी केले गेले नाहीत. सर्व शेअर्स विक्रीसाठी 'ऑफर फॉर सेल' होते. या अंतर्गत कंपनीचे विद्यमान प्रवर्तक आणि शेअरहोल्डर्स त्यांचे सुमारे 3.636 कोटी शेअर्स विक्रीसाठी ठेवतील.


'ऑफर-फॉर-सेल' (OFS) मध्ये, 1.746 कोटी शेअर्स राइन होल्डिंग्स लिमिटेड, केदारा कॅपिटल अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंडचे सुमारे 7,23,000 शेअर्स आणि रवी मोदी फॅमिली ट्रस्टचे 1.818 कोटी शेअर्स विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. 


वेदांत फॅशन पुरुषांच्या एथनिक वेअर सेगमेंटच्‍या व्‍यवसायात गुंतलेली आहे. त्याचा फ्लॅगशिप ब्रँड 'मान्यवर' संपूर्ण भारतात आहे आणि भारतीय वेडिंग आणि सेलिब्रेशन वेअर विभागातील मार्केट लीडर आहे. याशिवाय वेंडात फॅशनमध्ये त्वामेव, मंथन, मोहे आणि मेबाज सारखे ब्रँड देखील आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha