Upcoming IPO 2021 : यावर्षी अनेक मोठ्या कंपन्यांचे आयपीओ बाजारात लिस्ट (IPO in december) झाले आहेत. पुढच्या आठवड्यात बाजारात दोन कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. जर तुम्ही पैसे गुंतवण्याचा प्लान करत असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठीच. काही दिवसांपूर्वीच देशातील सर्वात मोठ्या आयपीओची लिस्टिंग करण्यात आली होती. त्यानंतर गुंतवणूकदारांना फारसा फायदा झाल्याचं दिसलं नव्हतं. अशातच अनेकांना तर तोटाही सहन करावा लागला होता. अशातच आता कोणत्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल? याबाबत काय आहे तज्ज्ञांचं मत जाणून घेऊया...
लवकरच मिळेल कमावण्याची संधी
पुढच्याच आठवड्यात Tega Industries आणि Star Health Insurance कंपनी बाजारात आयपीओ सादर करणार आहे. याव्यतिरिक्त DMR Hydroengine च्या आयपीओसाठीही अर्ज करु शकतात. या आयपीओसाठी तुम्ही 29 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करु शकता.
केव्हा खुला होणार आयपीओ?
दरम्यान, Star Health चा IPO सब्सक्रिप्शनसाठी 30 नोव्हेंबर रोजी खुला होणार आणि 2 डिसेंबर रोजी बंद होणार आहे. अशातच टेगा इंडस्ट्रीजचा आयपीओ 1 डिसेंबर रोजी खुला होणार असून 3 डिसेंबर रोजी बंद होणार आहे.
Star Health Insurance IPO
'बिग बुल' राकेश झुनझनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची भागीदारी असलेली कंपनी स्टार हेल्थ इंश्योरंसच्या (Star Health Insurance) आयपीओमार्फत कंपनी 7,249.18 कोटी रुपये उभारण्याचा प्लान करत आहे. आयपीओमध्ये तुम्ही कमीत कमी 1 लॉटसाठी बोली लावू शकता. ज्यामध्ये तुम्हाला 16 शेअर्स मिळतील आणि जास्तीत जास्त 13 लॉटसाठी अर्ज करु शकता.
प्राइज बँड काय?
जर प्राइज बँडबाबत बोलायचं झालं तर कंपनीनं Star Health आईपीओचा प्राइज बँड 870 ते 900 प्रति इक्विटी शेअर निश्चित झाला आहे. या आयपीओमध्ये कमीत कमी 13920 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या आयपीओच्या लिस्टिंगची संभाव्य तारिख 10 डिसेंबर आहे.
Tega Industries IPO
Tega Industries बाबत बोलायचं झालं तर, या आयपीओमार्फत 619.23 कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा प्लान आहे. कंपनीचा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी 1 डिसेंबर ते 3 डिसेंबररपर्यंत खुला होणार आहे. यामध्ये तुम्ही कमीत कमी एक लॉटसाठी बोली लावू शकता. गुंतवणूकदारांना एका लॉटमध्ये 33 इक्विटी शेअर्स मिळतील. IPO साठी प्राइज बँड 443-453 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे.
तज्ज्ञांचं मत काय?
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांना पैसे गुंतवताना बाजारावर लक्ष ठेवावे लागते. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळं जागतिक आणि देशांतर्गत बाजाराला मोठा झटका बसला आहे. निफ्टी 17000 च्या खालीही घसरू शकतो, असं तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे अशा स्थितीत बाजारात विक्रीचा मारा होणार आहे. त्याचबरोबर या काळात खुल्या होणाऱ्या आयपीओला नुकसानाचा सामनाही करावा लागू शकतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने दिली जात आहे. बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ABPLive.com च्या माध्यमातून येथे कोणालाही पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला जात नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Star Health Insurance Ipo : 'या' दिवशी येणार स्टार हेल्थचा आयपीओ; राकेश झुनझुनवाला यांचीही आहे गुंतवणूक
- Rakesh Jhunjhunwala शेअर बाजारातील कमावते झाले गमावते! राकेश झुनझुनवाला यांना 753 कोटींचा फटका
- स्टेट बँकेला RBIचा दणका; ठोठावला एक कोटींचा दंड
- Elon Musk : मस्क यांच्या 'या' कंपनीपासून दूर राहा, जाणून घ्या केंद्र सरकारने असे का म्हटले?