Paul Merchants Limited: 'या' कंपनीच्या शेअरची कमाल; अवघ्या 6 महिन्यांमध्ये मल्टीबॅगर, आता मिळणार बोनस शेअर
फायनांशियल सर्विसेज देणारी कंपनी पॉल मर्चेंट्स लिमिटेडचे शेयर्स गेल्या सहा महिन्यांमध्ये मल्टीबॅगर असल्याचं निष्पन्न झालं आहे. गेल्या सहा महिन्यांत या शेअरच्या किमतीत 100 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपॉल मर्चेंट्स कंपनीची साईज फार मोठी नाही. कंपनीचं सध्याचं एमकॅप केवळ 280 कोटी रुपये आहे. कंपनी फॉरेक्स, इंटरनॅशनल मनी ट्रान्सफर, पेट्रोलियम उत्पादनं, टूर, तिकीट, दूरसंचार सेवा इत्यादी व्यवसायात आहे.
सोमवारी पॉल मर्चेंट्सचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 2,735.65 रुपयांवर बंद झाले. या शेअर्ससाठी हा 52 आठवड्यांचा नवा उच्चांक आहे. त्याची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1,050 रुपये आहे, तर पीई रेशियो 5.75 आहे.
गेल्या 5 दिवसांत त्याची किंमत 8 टक्क्यांहून अधिक मजबूत झाली आहे, तर एका महिन्यात किंमत सुमारे 50 टक्क्यांनी वाढली आहे. आणि गेल्या 6 महिन्यांत किंमत 108 टक्क्यांनी वाढली आहे.
सहा महिन्यांपूर्वी कंपनीच्या एका शेअरची किंमत फक्त 1,317 रुपये होती. म्हणजेच, 6 महिन्यांत किंमत 1,418.65 रुपयांनी वाढली आहे. अशा प्रकारे गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीपासूनच दरांत 110 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सुमारे 4 वर्षांपूर्वी एका शेअरची किंमत 1000 रुपयांपेक्षा कमी होती. म्हणजे, तेव्हापासून जवळपास 3 पटींनी किंमत वाढली आहे.
आता त्याच्या शेअर होल्डर्सना एक नवी भेट मिळणार आहे. कंपनीच्या बोर्डानं सध्याच्या शेअर होल्डर्सना प्रत्येक शेअरमागे दोन शेअर्सचा बोनस देण्याची शिफारस केली आहे. बोर्डानं अद्याप रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही.
टीप : वर देण्यात आलेली माहिती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. त्यामुळे बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदार म्हणून, पैसे गुंतवण्यापूर्वी नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ABP माझा यातून कोणतीही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.