SIP News : जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल परंतु दररोजचा ताण नको असेल तर इक्विटी आधारित म्युच्युअल फंड तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. म्युच्युअल फंड अनुभवी फंड व्यवस्थापकांद्वारे व्यवस्थापित केला जातो. म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला कोणत्या समुहाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची आहे ते देखील तुम्ही निवडू शकता. तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडात दोन प्रकारे पैसे गुंतवू शकता. पहिली म्हणजे एकरकमी रक्कम जमा करणे आणि दुसरे म्हणजे SIP द्वारे गुंतवणूक करणे.


SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. म्हणजेच काय तर तुम्ही म्युच्युअल फंडात काही पैसे अंतराने टाकता आणि कमी जोखीम घेऊन तुम्ही अधिक गुंतवणूक मिळवू शकता. तुम्हाला दर आठवड्याला, दर महिन्याला किंवा कधी गुंतवणूक करायची आहे हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. हे तुमच्याकडे असलेल्या निधीच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच गुंतवणूक करत असाल तर तुम्ही 500 रुपयांपासून सुरुवात करू शकता. हीच एसआयपीमध्ये गुंतवणूक सुरू करताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे.


लक्ष्य काय आहे?
तुम्ही गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी तुम्हाला नजीकच्या भविष्यात निधीची गरज आहे की नाही हे पाहा. याद्वारे तुम्ही किती गुंतवणूक करू इच्छिता हे ठरवू शकाल. प्रत्येकाची आर्थिक उद्दिष्टे वेगवेगळी असू शकतात. जसे की एखाद्याला कार घ्यायची असेल  किंवा एखाद्याला स्पोर्ट्स बाईक घ्यायची असेल तर दोन्हीसाठी लागणाऱ्या निधीत फरक आहे. त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीच्या धोरणातही फरक असला पाहिजे.


फंड काळजीपूर्वक निवडा


म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून तुम्ही केवळ इक्विटी फंडातच नाही तर डेट आणि हायब्रिड फंडांमध्येही गुंतवणूक करू शकता. ते तुमची जोखीम घेण्याची क्षमता आणि तुम्हाला अपेक्षित असलेल्या परताव्यावर अवलंबून असेल. दीर्घकालीन गुंतवणुकीसह आणि जोखीम घेण्याची क्षमता यावर तुम्ही इक्विटीमध्ये गुंतवणुकीचा विचार करु शकता.


महागाईच्या पुढे रहा
तुमची गुंतवणूक अशा प्रकारे करा की परतावा महागाई दरापेक्षा जास्त असेल. अनेक वेळा निधी उभारल्यानंतरही तो कामात कमी पडतो कारण तोपर्यंत महागाईने त्याला मात दिली असेत आणि उत्पादन किंवा सेवेची किंमत तुमच्या गुंतवणुकीच्यावर जाते. त्यामुळे परतावा लक्षात घेऊन गुंतवणुकीचा पर्याय निवडा.


पैसे एकाच ठिकाणी ठेवू नका
सर्व पैसे एकाच ठिकाणी ठेवल्यास, एकाच वेळी ते सर्व बुडण्याचा धोका असतो. म्हणून तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणा. वेगवेगळ्या मालमत्ता वर्गात पैसे गुंतवा. गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्यायही पाहता येतात. यासह, कोणत्याही परिस्थितीच्या वेळी तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि तुम्हाला ते उपलब्ध देखील होतील.