अमरावती : हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar ) यांच्या ताफ्यावर शीवसैनीकांनी (Shiv sena activists) हल्ला केलाय. यावेळी शिवसैनिकांनी पन्नास खोके एकदम ओके अशी नारेबाजी केलीय. अमरावती जिल्ह्यातील अंजनगांव सुर्जी येथे हा हल्ला करण्यात आलाय.  


शिवसेनेतून बंडखोरी करून शिंदे गटात गेलेले आमदार संतोष बांगर आज अंजनगांव सुर्जी येथील देवनाथ मठातून दर्शन घेऊन निघाले असता शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर हल्लाबोल केला. यावेळी शिवसैनिकांनी पन्नास खोके एकदम ओकेचे नारे देण्यात आले. संतोष बांगर यांच्या वाहनांचा ताफा अंजनगांव सुर्जी  येथे येताच कार्यकर्ते वाहतांना आडवे गेले. यावेळी आमदार ज्या बाजूला गाडीत बसले होते त्या गाडीचा दरवाजा देखील उघडला. परंतु, सुरक्षा रक्षकाने धाव घेत दरवाजा बंद केला. यावेळी शिवसैनिक खूपच आक्रमक झाले होते. परंतु, बांगर यांनी आपली गाडी न थांबवता तेथून निघून गेले. 


आमदार संतोष बांगर हे सर्वात शेवटी शिंदे गटात सहभागी झाले होते. शिंदे गटात गेल्यानंतर त्यांनी अनेक वेळा आक्रमक भाषेचा वापर करत शिवसैनिकांना आव्हान दिलं होतं. परंतु, आज आमदरावतील आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात शिवसैनिकांचा उद्रेक पाहायला मिळाला. संतोष बांगर हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघातील आमदार आहेत. शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीमध्ये असताना संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती.उद्धव ठाकरेंसाठी भरसभेत त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसून आले होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या विश्वासमतासाठी विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील संतोष बांगर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने होते. मात्र, एका रात्रीत संतोष बांगर यांनी गट बदलत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं संतोष बांगर यांची राज्यभर चर्चा झाली होती. त्यानंतर झालेल्या सभेत त्यांनी अनेकवेळा आक्रमक शैलीत भाषण केलं होतं. 


चालकाचे प्रसंगावधान


संतोष बांगर हे आज अमरावतीलमधील अंजनगाव सुर्जीमध्ये आले होते. यावेळी पोलिसांची गाडी पुढे जाताच एक शिवसैनिक त्यांच्या गाडीला आडवा आला. शिवसैनिक पुढं आल्यामुळे बागंर यांच्या गाडीच्या चालकांने गाडीचा वेग कमी केला. त्यावेळी इतर शिवसैनिक बांगर यांच्या गाडीकडे धावून आले. बांगर बसलेल्या बाजचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रसंगावधान राखर चालकाने गाडी न थांबवता तेथून पुढे नेली.  


महत्वाच्या बातम्या


Santosh Bangar: पुणेकर डॉक्टरांचा संजय बांगराविरोधात एल्गार! थेट शिंदे सरकारकडे केली तक्रार 


Hingoli : गरोदर महिलांना रस्त्याअभावी रुग्णालयात पोहचण्यासाठी अडचणी, आ. संतोष बांगर यांच्या मतदारसंघातील परिस्थिती