FabIndia IPO : एथनिक वेअर ब्रँड फॅब इंडियाच्या आयपीओला बाजार नियामक सेबीची मंजुरी मिळाली आहे. सेबीने 30 एप्रिल रोजी 4,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावित आयपीओला हिरवा झेंडा दाखवला आणि सोमवारी म्हणजेच 2 मे रोजी कंपनीला त्यासंबंधीचे निरीक्षण पत्र मिळालं. फॅबइंडियाने 2022 मध्ये 4,000 कोटी रुपयांचा आयपीओ आणण्यासाठी या वर्षी 24 जानेवारी रोजी सेबीकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा मसुदा दाखल केला होता.
प्रॉस्पेक्टसच्या मसुद्यानुसार, कंपनीने 500 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करण्याची आणि ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत 2,50,50,543 इक्विटी शेअर्सची विक्री करण्याची योजना आखली आहे. यामध्ये बिसेल कुटुंबाव्यतिरिक्त, प्रेमजी इन्व्हेस्ट, बजाज होल्डिंग्ज आणि कोटक इंडिया अॅडव्हांटेज ऑफर फॉर सेलद्वारे त्यांचे स्टेक विकू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार या इश्यू अंतर्गत कारागीर आणि शेतकऱ्यांना सुमारे 7.75 लाख शेअर्स भेट देण्याची योजना आहे.
शेतकरी आणि कारागिरांना शेअर गिफ्ट देण्याची योजना
सेबीकडे दाखल केलेल्या प्रॉस्पेक्टसनुसार, कंपनीचे प्रवर्तक शेतकरी आणि कारागिरांना शेअर्स भेट देऊ शकतात. फॅब इंडियाच्या मते, प्रवर्तक बिमला नंदा बिसेल आणि मधुकर खेरा यांनी त्यांचे संबंधित डीमॅट खाते उघडले आहेत आणि बिसेलने 4 लाख इक्विटी शेअर्स आणि खेरा यांनी 3,75,080 इक्विटी शेअर्स खात्यात हस्तांतरित केले आहेत. हे शेअर्स कारागीर आणि शेतकऱ्यांना भेट म्हणून देण्याची योजना आहे. या इश्यू अंतर्गत 500 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. नवीन शेअर्सद्वारे उभारलेले 250 कोटी रुपये NCDs (नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर) च्या ऐच्छिक पूर्ततेसाठी आणि 150 कोटी रुपयांच्या कर्जाच्या पूर्व पेमेंटसाठी वापरले जातील.
गेल्या आर्थिक वर्षात तोटा
लाइफस्टाइल रिटेल ब्रँड फॅब इंडिया 22 वर्षांपूर्वी 1960 मध्ये सुरू झाला होता. हे प्रामुख्याने अस्सल, टिकाऊ आणि पारंपारिक उत्पादने विकते. कंपनीचे Fabindia आणि Organic India हे देशातील सर्वात लोकप्रिय ब्रँड आहेत. आर्थिक वर्ष 2021 नुसार कंपनीला 1059 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. परंतु, 116 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
महत्वाच्या बातम्या