मुंबई : गेल्या काही महिन्यांत दिग्गज कंपन्यांचे आयपीओ आले आहेत. या आयपीओंत गुंतवणूक करून बरेच गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. सध्या अशाच एका आयपीओची सगळीकडे चर्चा होत आहे. लवकरच NTPC आणि TATA Power अशा दिग्गज कंपन्यांना सोलार पॅनल पुरवणाऱ्या दिग्गज कंपनीचा 27 ऑगस्ट रोजी आयपीओ येणार आहे. मेनोबर्ड श्रेणीतील या आयपीओत 27 ते 29 ऑगस्ट या काळात बोली लावता येईल. सोलार सेल आणि सोलार पॅनल तयार करणाऱ्या या कंपनीने आपल्या आयपीओसाठी 427 ते 450 रुपयांचा किंमत पट्टा (प्राईस बँड) निश्चित केला आहे.
ग्रे मार्केटमध्ये आयपीओचा बोलबाला
येत्या 27 ऑगस्ट रोजी ज्या कंपनीचा आयपीओ येणार आहे, त्या कंपनीचे नाव प्रिमियम एनर्जीज (Premier Energies) असे आहे. सध्या या कंपनीच्या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रे मार्केट प्रीमियममध्ये (जीएमपी) या आपयीओसाठी 330 रुपये प्रतिशेअरच्या हिशोबाने पैसे मोजले जात आहे. म्हणजेच हा आयपीओ कदाचित 780 रुपयांवर शेअर बाजारावर सूचिबद्ध होऊ शकतो. ही किंमत किंमत पट्ट्याच्या तुलनेत 73.33 टक्क्यांनी अधिक आहे. ग्रे मार्केट प्रिमियमच्या आधारेच हा आयपीओ कशी कामगिरी करणार, याचा अंदाज बांधला जातो.
प्रीमियर एनर्जीज आयपीओची संपूर्ण माहिती
प्रीमियर एनर्जीजचा आईपीओ एकूण 2,830.40 कोटी रुपयांचा असेल. यात 2.87 शेअरर्स हे नव्याने इश्यू केले जातील. या शेअर्सची किंमत 1,291.40 कोटी रुपये आहे. या आयपीओत 3.42 कोटी शेअर्स विकले जातील. या शेअर्सचे मूल्य 1,539 कोटी रुपये आहे. या आयपीओत तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर कमीत कमी 33 शेअर्ससाठी अर्ज करावा लागेल. म्हणजेच तुम्हाला या यायपीओत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे कमीत कमी 14,850 असायला हवेत. हा आयपीओ नंतर बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होण्याची शक्यता आहे. 3 सप्टेंबर रोजी प्रीमियर एनर्जीज ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध होऊ शकते.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
UPS Calculation : मूळ पगार 50000 रुपये असेल तर UPS अंतर्गत किती मिळणार पेन्शन?
शेअर बाजारावर 'या' शेअर्सचा बोलबाला, एका आठवड्यात गुंतवणूकदार मालामाल!