शेअर बाजारावर 'या' शेअर्सचा बोलबाला, एका आठवड्यात गुंतवणूकदार मालामाल!
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. याच तेजीमुळे अनेक शेअर्सचे मूल्य चांगलेच वाढले आहे. खाली दिलेले स्टॉक्सही आठवडाभरात चांगलेच तेजीत दिसत आहेत.
share market (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/6
गेल्या काही दिवसांपासून भांडवली बाजारात पुन्हा तेजी दिसतेय. सलग दुसऱ्या आठवड्यात निर्देशांकांचा आलेख चढाच आहे. गेल्या सात दिवसांत भांडवली बाजारात तीन टक्क्यांपेक्षा अधिक तेजी आली आहे.
2/6
भांडवली बाजाराच्या या स्थितीचा फायदा पेनी स्टॉक्सना झाला आहे. गेल्या आठवडाभरात 152 शेअर असे आहेत, ज्यांचे मूल्य कमीत कमी 10-10 टक्क्यांनी वाढले आहे. यापैकी 9 शेअर्सचा दर हा 30-30 टक्क्यांपेक्षाही जास्त आहे.
3/6
स्मॉलकॅप सेगमेंटमधील राने मद्रास या शेअरमध्ये सर्वाधिक 39 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. त्यानंतर एसआयपीसीमध्ये 38 टक्क्यांची, श्रीराम प्रॉपर्टीजमध्ये 36 टक्क्यांची तर टेस्टी बाइट इटेबल्स या शेअरमध्ये 35 टक्क्यांची तेजी आली आहे.
4/6
नेल्को, यूफ्लेक्स आणि टीव्हीएस ग्रुपच्या टीव्हीएस इलेक्ट्रॉनिक्स या शेअर्समध्ये गेल्या आठवडाभरात 25 ते 30 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली.
5/6
मिडकॅप सेगमेंटमध्ये पिरामल एंटरप्रायझेस या शेअरमध्ये 11 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. न्यू इंडिया इन्शुरन्स आणि वोल्टास या कंपन्यांच्या शेअरमध्ये 10-10 टक्क्यांची तेजी आली आहे.
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 25 Aug 2024 03:38 PM (IST)