PN Gadgil Jewellers IPO: महाराष्ट्रातील मोठा ज्वेलर ब्रँड असलेल्या पीएन गाडगीळ ज्वेलर्स या दागिने घडवणाऱ्या कंपनीचा येत्या 10 सप्टेंबर रोजी आयपीओ येत आहे. पीएन गाडगीळ ज्वेलर्स यातून 1100 कोटी रुपये उभे करण्याच्या प्रयत्नात आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 456 रुपये ते 480 रुपये प्रति शेअर असा आहे. या कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू 10 रुपये प्रति शेअर आहे. ही कंपनी नंतर NSE आणि BSE वर लिस्ट होणार आहे. सध्या ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचा शेअर चांगल्या स्थितीत आहे.

  


एका लॉटची किंमत किती?


ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून 22,916,667 इक्विटी शेअर्स विकणार आहे. यातील 850 कोटी रुपयांचे 17,708,334 इक्विटी शेअर्स जारी केले जातील. तर ऑफर फॉर सेल अंतर्गत 250 कोटी रुपयांचे 5,208,333 इक्विटी शेअर्स विकले जातील. या आयपीओत गुंतवणूक करण्यासाठी किरकोळ गुंतवणूकदारांना 31 शेअर्सचा एक लॉट म्हणजेच कमीत कमी 14,880 रुपयांचे शेअर्स खरेदी करावे लागतील. 


आयपीओच्या संदर्भात महत्त्वाच्या तारखा 


आईपीओ गुंतवणुकीसाठी कधी खुला होणार - 10 सप्टेंबर 2024, मंगळवार


आईपीओत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख- 12 सप्टेंबर 2024, गुरुवार


शेअर्सची अलॉटमेंट- शुक्रवार, 13 सप्टेंबर 2024


रिफंड कधी मिळणार - सोमवार, 16 सप्टेंबर 2024


शेअर्स डी-मॅट खात्यात कधी येणार -सोमवार, 16 सप्टेंबर 2024


आयपीओ शेअर बाजारावर सूचिबद्ध कधी होणार - मंगळवार,  12 सप्टेंबर 2024


कंपनी उभारलेला निधी कुठे वापरणार?  


कंपीन या आयपीओतून 850 कोटी रुपयांचा फंड जामा करणार आहे. यातील 387 कोटी रुपयांत पीएन गाडगीळ ज्वेलर्स महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 12 नवे स्टोअर्स चालू करणार आहे. तर 300 कोटी रुपयांतून कंपनी कर्ज फेडणार आहे. फेब्रुवारी, 2024 पर्यंत या कंपनीच्या डोक्यावर एकूण 377.45 कोटी रुपयांचे कर्ज होते. कंपनी उर्वरित पैशांच्या मदतीने कॉर्पोरेटची कामे करणार आहे.   


या कंपनीचे सध्या महाराष्ट्रात 33 तर अमेरिकेत एक स्टोअर आहे. यात 23 स्टोअर्स हे कंपनीचे तर 10 स्टोअर्स हे फ्रेंचायझीचे आहेत. आर्थिक वर्ष 2023 मध्ये या कंपनीचा नफा 23.7 कोटी रुपये होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा नफा 34.8 टक्के जास्त होता. 


 (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


मोठी बातमी! गणेश चतुर्थीनिमित्त सरकारचे खास गिफ्ट, आता फक्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा, 4 वस्तू मिळणार


देशातल्या 'या' दिग्गज बँकेचं कर्ज महागलं, घेतला महत्त्वाचा निर्णय!


'हे' तीन स्टॉक्स तुम्हाला देणार तगडे रिटर्न्स, जाणून घ्या स्टॉपलॉस आणि टार्गेट काय?