एक्स्प्लोर

IPO Update : संरक्षण क्षेत्रातील कंपनीचा आयपीओ धमाका करणार, GMP वर जोरदार प्रतिसाद, दुप्पट परतावा मिळणार?

IPO Update सी2सी अ‍ॅडवान्सड सिस्टम्स लिमिटे चा एसएमई आयपीओ जोरदार चर्चेत आहेत. या कंपनीच्या आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम 220 रुपयांवर आहे.

मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून जोरदार घसरण सुरु आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी त्यांच्या समभागांची विक्री केल्यानं आणि भारतीय कंपन्यांची कामगिरी दुसऱ्या तिमाहीत समाधानकारक नसल्यानं बाजारात घसरण झाली आहे. गुंतवणूकदार यामुळं चिंतेत आहेत. या दरम्यान सी2सी अ‍ॅडवान्सड सिस्टम्स लिमिटेड या कंपनीचा एसएमई आयपीओ येणार आहे. या कंपनीच्या आयपीओची जोरदार चर्चा सुरु आहे. सध्या या कंपनीच्या आयपीओचा प्रतिशेअर जीएमपी 220 रुपयांवर आहे.

आयपीओ कधी येणार? 

सी2सी अ‍ॅडवान्सड सिस्टम्स लिमिटेडचा एसएमई आयपीओ 22 नोव्हेंबरपासून सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार आहे. तर, या आयपीओची लिस्टींग 29 नोव्हेंबरला होणार आहे. 99.07 कोटी रुपयांच्या आयपीओद्वारे 43.84 लाख नवे शेअर जारी केले जाणार आहेत. 

या कंपनीच्या शेअरची आयपीओमध्ये 214-226 रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये  क्वालिफाइड इन्स्टीट्यूशनल बायर्स (QIB) यांच्यासाठी 50 टक्के कोटा निश्चित करण्यात आला आहे. रिटेल गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के कोटा निश्चित करण्यात आला आहे. तर, 15 टक्के कोटा नॉन-इन्स्टीट्यूशनल गुंतवणूकदारांसठी निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओचा एक लॉट घेण्यासाठी किमान 1,35,600 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.  

सी2सी अ‍ॅडवान्सड सिस्टम्स लिमिटेडचा GMP काय आहे?  

सी2सी अ‍ॅडवान्सड सिस्टम्स लिमिटेडच्या आयपीओची ग्रे मार्केट प्रीमियमवर जोरदार चर्चा सुरु आहे. रविवारपर्यंत या कंपनीच्या आयपीओचा जीएमपी 220 रुपयांवर होता. म्हणजेच गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट परतावा हा जीएमपी कायम राहिल्यास त्यांना मिळू शकतो. जीएमपीमधील हाच ट्रेंड कायम राहिल्यास सी2सी अ‍ॅडवान्सड सिस्टम्स लिमिटेडच्या एका शेअरचं लिस्टींग 446 रुपयांना होईल. म्हणजेच एका शेअरमागं गुंतवणूकदारांना 226 रुपयांचा फायदा होऊ शकतो.  

कंपनी काय काम करते?

सी2सी अ‍ॅडवान्सड सिस्टम्स लिमिटेड कंपनी प्रोसेसर, पॉवर, रेडिओ फिक्वेन्सी, रडार, मायक्रोवेव, एम्बेडेड सॉफ्टवेअर आणि फर्मवेअरसह स्ट्रॅटेजिक डिफेन्स सोल्यूशनच्या पूर्ण स्पेक्ट्रम साठी डिझाईन पुरवते.  C2C Advanced Systems Limited भारतीय शेयर बाजारात लिस्टेड असलेल्या पारस डिफेंस अँड स्पेस टेक्नोलॉजीज सोबत स्पर्धा करते. यामुळं या कंपनीच्या आयपीओला जोरदार प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. 

इतर बातम्या :

मोठी बातमी! हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत, 'या' 11 राज्यात नियम लागू

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

बँकेत नोकरीची मोठी संधी! 11 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, पगार मिळणार 64 हजार रुपये, कसा कुठे कराल अर्ज? 
बँकेत नोकरीची मोठी संधी! 11 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, पगार मिळणार 64 हजार रुपये, कसा कुठे कराल अर्ज? 
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
Tamil Nadu : सरकारी रुग्णालयात जन्म घेणाऱ्या नवजात बालकांना सोन्याची अंगठी मिळणार, जोसेफ विजय सरकारनं 1 लाख 28 हजार अंगठ्यांची ऑर्डर दिली
जोसेफ विजय सरकारचा मोठा निर्णय, सरकारी रुग्णालयात जन्म झालेल्या बालकांना सोन्याची अंगठी देणार

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget