Gold Silver Price : गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price) वाढ होताना दिसतेय. वाढत्या दराचा सोने खरेदीदारांना मोठा फटका बसतोय. सोन्यामध्ये गुंतवणूक (Invetsment) करणं ग्राहकांच्या फायद्याचंही ठरत आहे. कारण सोन्याच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत आहे. काल देशा देशात अक्षय तृतीयेचा सण साजरा झाला. या दिवशी देखील सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहयाला मिळाले. दरम्यान, आज सोन्या चांदीचे नेमके दर काय आहेत? कोणत्या शहरात किती दर? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जाते. त्यामुळं काल मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी झाली. हलक्या वजनाचे दागिने किंवा सोन्याची नाणी घेण्याकडे लोकांचा कल दिसून आला. दरम्यान, आज नेमके सोन्याचे दर काय आहेत. याबाबतची माहिती पाहुयात.
कोणत्या शहरात सोन्या चांदीला किती दर?
दिल्ली -22 कॅरेट सोने - 67,400, 24 कॅरेट सोने - 73,510 तर चांदी- 87,000 किलो
मुंबई - 22 कॅरेट सोने - 67,250, 24 कॅरेट सोने - 73,360 तर चांदी- 87,000 किलो
चेन्नई - 22 कॅरेट सोने - 67,500, 24 कॅरेट सोने - 73,640 तर चांदी- 90,500 किलो
कोलकाता - 22 कॅरेट सोने - 65,250, 24 कॅरेट सोने -73,360, चांदी- 87,000
लखनऊ - 22 कॅरेट सोने - 67,400, 24 कॅरेट सोने -73,510, चांदी- 87,000
अहमदाबाद - 22 कॅरेट सोने - 67,300, 24 कॅरेट सोने -73,410, चांदी- 87,000
वर्षभरापूर्वी सोन्याचा दर किती?
दरम्यान, इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, अक्षय तृतीयेच्या एक दिवस आधी म्हणजे 9 मे रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 71,502 रुपये होता. मागील वर्षी याच दिवशी 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 60,616 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. पण वर्षभरात सोन्याच्या दरात तब्बल 12 हजार रुपयांची वाढ झालीय. सोन्याच्या गुंतवणुकीवर वर्षभरात 18 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. 2014 मध्ये अक्षय्य तृतीयेच्या दिवशी 24 कॅरेट सोन्याची किंमत 28,871 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. जी 2017 पर्यंत जवळपास स्थिर होती. मात्र, 2017 नंतर सोन्याच्या दरात दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत गेली. आज सोन्याच्या दरानं 73 हजारांचा टप्पा गाठला आहे.
कोणत्या साली किती वाढ झाली?
मिळालेल्या माहितीनुसार 2018 मध्ये सोन्याची किंमत 31,598 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी होती. जी 2019 मध्ये 31,729 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आली. यानंतर 2020 मध्ये सोन्याने उसळी घेतली आणि त्याची किंमत 46,527 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली. त्यानंतर 2021 मध्ये तो 47,700 रुपये, 2022 मध्ये 50,800 रुपये आणि 2023 मध्ये सोन्याचा भाव 60,616 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता.
महत्वाच्या बातम्या: