Investment plan : भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक (Investment) करणं गरजेचं आहे. आत्तापासून केलेली गुंतवणूक ही भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी फायद्याती ठरते. तुम्ही जर दररोज थोडी थोडी गुंतवणूक केली तर तुम्ही देखील करोडपती होऊ शकता. तुम्हाला जर करोडपती व्हायचं असेल तर त्यासाठी नेमकं काय करावं लागेल? याबाबतची माहिती पाहुयात. 


SIP मध्ये गुंतवणूक करणं फायद्याचे 


तुम्ही जेवढ्या लवकर गुंतवणूक सुरु कराल तेवढ तुच्या फायद्याचे ठरते. भविष्यातील धोक टाळण्यासाठी आत्तापासून गुंतवणूक करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला करोपडपती व्हायचं असेल तर तुम्हाला म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करावी लागेल. एसआयपीमध्ये दर महिन्याला काही पैसे जमा करुन, तुम्ही दीर्घ मुदतीसाठी मोठा निधी तयार करु शकता. 


कशी कराल गुंतवणूक?


तुम्हाला जर करोडपती व्हायचं असेल तर त्याच आधीच आर्थिक नियोजन करावं लागेल. तुम्हाला 1 कोटी रुपयांचा निधी तयार करायचा असेल तर तुम्हाला एक निश्चित कालमर्यादा तयार करावी लागेल. तुम्ही कोणतीही कालमर्यादा निश्चित केली नाही, तर तुम्हाला दर महिन्याला किती गुंतवणूक करायची हे ठरवण्यात अडचण येईल .तुम्हाला जर 10 वर्षात 1 कोटी रुपयांचा निधी तयार करायचा असेल तर योग्य नियोजन करावं लागेल. 10 वर्षांत 1 कोटी रुपयांचा निधी तयार करण्यासाठी तुम्हाला दरमहा सुमारे 70,500 रुपये जमा करावे लागतील. तर तुमचा एकूण निधी 1,96,45,338 रुपये होईल. यामध्ये, SIP वर वार्षिक परतावा 15 टक्के मिळेल. 


अलीकडच्या काळात पैशांची गुंतवणूक करण्याचे विविध पर्याय खुले


अलीकडच्या काळात पैशांची गुंतवणूक करण्याचे विविध पर्याय खुले झाले आहेत. पण पैशांची गुंतवणूक करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सुरक्षीत ठिकाणी गुंतवणूक करतो आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण केलेल्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळतो. या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. दरम्यान, म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक हीसुद्धा सुरक्षीत आणि फायद्याची गुंतवणूक आहे. यामाध्यमातून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. फक्त गुंतवणूक करण्यापूर्वी त्याच योग्य नियोजन करणं देखील महत्वाचे आहे. तुम्हाला करोडपती व्हायचं असेल तर तुमच्या बचतीमध्ये गुंतवणुकीमध्ये सातत्य पाहिजे. तुम्हाला ठरावीक रक्कम दरमहा भरावीच लागेल. 


महत्वाच्या बातम्या:


50-30-20 चा नियम आहे तरी काय? पगार संपणार नाही, सेव्हिंगही होणार भरपूर!