Investment plan : आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लोक गुंतवणुकीचा (Investment) पर्याय निवडतात. जसे उच्च शिक्षण, विवाह, मालमत्ता. दरम्यान, गुंतवणूकदारांना जर भांडवली बाजारातील चढउतारांचा धोका पत्करायचा नाही आणि सुरक्षित ठिकाणी त्यांचे पैसे गुंतवायचे आहेत. त्यांना फिक्स डिपॉझिट, सरकारी पोस्ट ऑफिस स्कीम सारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण तुम्हाला जर गुंतवणुकीतून अधिक परतावा हवा असेल तर गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.


तुम्हाला जर चांगला परतावा हवा असेल तर आज आम्ही तुम्हाला 5 वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांबद्दल सांगत आहोत. यामध्ये तुम्हाला जास्त परतावा मिळतो पण मार्केटशी जोडले गेल्याने त्यात मार्केट रिस्कही असते. तुम्ही तुमच्या जोखमीनुसार त्यात गुंतवणूक करू शकता आणि परतावा मिळवू शकता.


1) म्युच्युअल फंड गुंतवणूक


म्युच्युअल फंड वेगवेगळ्या स्त्रोतांकडून निधी घेतात. बाँड, स्टॉक आणि डेटमध्ये गुंतवणूक करतात. यामध्ये तुम्हाला जास्त परतावा मिळतो. बाजाराशी निगडीत असल्यानं, त्यात बाजारातील जोखीम देखील असते. परंतू, मोठ्या संख्येनं गुंतवणूकदार चांगल्या परताव्यासाठी त्याचा अवलंब करतात. फंडाच्या कामगिरीनुसार, तुमचे पैसे 3 ते 5 वर्षांत दुप्पट होऊ शकतात.


2)  सोने-चांदीमध्ये गुंतवणूक 


कर्जाचे साधन हे गुंतवणुकीचे माध्यम आहे. त्यात गुंतवणूक करून तुम्हाला व्याज मिळवण्याची संधी मिळते. व्याज आगाऊ ठरवले जाते. कंपन्या किंवा संस्था या गुंतवणूक पर्यायाचा वापर कर्ज उभारण्यासाठी करतात. गुंतवणूकदार निश्चित व्याज उत्पन्न मिळविण्यासाठी त्यात गुंतवणूक करतो. या साधनांमध्ये गुंतवणूक दीर्घ मुदतीसाठी किंवा अल्प मुदतीसाठी केली जाऊ शकते.


3) रिअल इस्टेट


रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक हा देखील गुंतवणुकीचा चांगला मार्ग आहे. घर किंवा जमीनीत केलेली गुंतवणूक सर्वोत्तम आणि खात्रीशीर गुंतवणूक मानली जाते. यामध्ये गुंतवणूकदारांना दीर्घकाळात चांगला परतावा मिळू शकतो. भाड्याने किंवा सिक्युरिटीवर घर देऊनही तुम्ही मासिक उत्पन्न मिळवू शकता. हे प्रत्येकासाठी शक्य नाही पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या पर्यायात नक्कीच गुंतवणूक करावी.


4 )कर्ज साधन


सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करणे हा देखील एक चांगला मार्ग आहे. महिलांसाठी हे गुंतवणुकीचे सर्वात लोकप्रिय माध्यम आहे. महिला अनेक वर्षांपासून सोन्यात गुंतवणूक करत आहेत. पण आता भौतिक सोन्याव्यतिरिक्त लोक डिजिटल सोन्याकडेही वळत आहेत. याशिवाय गोल्ड एक्स्चेंज-ट्रेडेड फंड, सार्वभौम सुवर्ण रोखे यामध्ये गुंतवणूक करता येते. येथे गुंतवणुकीत इक्विटीपेक्षा कमी जोखीम असते आणि चांगला परतावा मिळतो.


5) शेअर बाजार


शेअर बाजारातील गुंतवणूक ही देखील फायद्याची ठरते. यामध्ये थोडी जोखीम आहे. पण तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर जलद पैसे कमवण्याचे हे चांगले साधन आहे. जर तुम्ही योग्य अभ्यास करुन योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्हाला वार्षिक चांगला परतावा मिळू शकतो. पण यासाठी तुम्हाला काही मूलभूत आणि तांत्रिक समज असायला हवी. याबाबत तुम्ही मार्केट तज्ज्ञांचा सल्लाही घेऊ शकता.


महत्त्वाच्या बातम्या:


PPF किंवा SIP? दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक केल्यावर 15 वर्षात किती नफा होईल? समीकरण जाणून घ्या