Investment Plan : सध्या केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक शेअर बाजारात (Share Market) अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमचे पैसे सुरक्षित हवे असतील आणि तुम्हाला चांगला परतावाही मिळवायचा असेल तर योग्य ठिकाणी योग्य वेळी गुंतवणूक (investment) करणं गरजेचं असतं. तुम्ही जर उज्जीवन स्मॉल फायनान्स या लघु वित्त बँकेच्या (Ujjivan Small Finance Bank) मुदत ठेवी (FD) मध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला परतावा मिळेल. फक्त 9 महिन्यांमध्ये तुम्हाला ठेवीवर 7.50 टक्के रिटर्न मिळेल. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने त्यांच्या 9 महिन्यांच्या FD योजनेच्या व्याजदरांमध्ये सुधारणा केली आहे. व्याजदर आता 7 टक्क्यांवरून 7.50 टक्के करण्यात आला आहे. याशिवाय उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने इतर एफडीच्या व्याजदरात बदल केलेला नाही.
उर्वरित एफडीवरील व्याजदर किती?
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने 12 महिन्यांच्या मुदतीच्या FD योजनेचा व्याजदर पूर्वीप्रमाणेच ठेवला आहे. सामान्य ग्राहकांना या FD वर 8.25 टक्के व्याज मिळत राहील आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.75 टक्के व्याज मिळत राहील. त्याचवेळी, ग्राहकांना बँकेच्या विशेष Platina FD वर 0.20 टक्के अतिरिक्त व्याजाचा लाभ मिळत राहील. बँकेने सामान्य ग्राहकांसाठी 9 महिन्यांच्या एफडीवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांनाही यावर 0.50 टक्के म्हणजेच एकूण 8 टक्के व्याज मिळेल.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याजदर देणारी बँक
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे एमडी आणि सीईओ संजीव नौटियाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही ग्राहकांना अल्प मुदतीच्या ठेवींवर अधिक व्याजाची अपेक्षा असते. म्हणून, आम्ही 9 महिन्यांच्या मुदतीच्या FD योजनांचे व्याजदर सुधारित केले आहेत. या वाढीसह, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक अजूनही मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बँकांमध्ये आहे.
इतर लघु वित्त बँकांमध्ये एफडी व्याज
सध्या भारतात लोकांना FD वर चांगले व्याज मिळत आहे. याचे कारण भारतीय रिझर्व्ह बँकेचे धोरण दर चांगले आहे. व्यावसायिक बँकांच्या तुलनेत, लघु वित्त बँकांना एफडीवर चांगले व्याज मिळत आहे. कारण त्यांचा भांडवली आधार लहान आहे. त्यामुळे अधिक ठेवी आकर्षित करण्यासाठी ते FD वर चांगले व्याज देतात.
देशातील आघाडीच्या लघु वित्त बँकांचे 9 महिन्यांचे एफडी व्याजदर किती?
जन स्मॉल फायनान्स बँकेच्या 9 महिन्यांच्या FD वर 8.10 टक्के व्याज मिळते.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेच्या 9 महिन्यांच्या एफडीवर 6.25 टक्के व्याज उपलब्ध आहे.
AU Small Finance Bank 9 महिन्यांच्या FD वर 6.50 टक्के व्याज देते.
कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकेच्या 9 महिन्यांच्या FD वर 5.50 टक्के व्याजदर आहे.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेच्या 9 महिन्यांच्या एफडीवरील व्याज दर 7.75 टक्के आहे.
महत्वाच्या बातम्या: