Former MLA Dnyaneshwar Patil passed away : भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील (Former MLA Dnyaneshwar Patil) यांचे निधन झाले आहे.  रात्री 10.27 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव सकाळी  10 ते 12 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता अंत्ययात्रा निघणार आहे.  भोत्रा रोडच्या शेतामध्ये त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.  


एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून  ज्ञानेश्वर तात्या पाटील यांची ओळख होती. ग्रामीण भागात त्यांना मोठ्या प्रमाणात माननारा वर्ग होता. येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची देखील चर्चा सुरु होती. गेल्या काही महिन्यांपासून ज्ञानेश्वर पाटील हे दीर्घ आजारांमुळं पुण्यात उपचार घेत होते. उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे. धारशिव जिल्ह्यात ज्ञानेश्वर पाटील यांनी कार्यकर्त्यांचं जाळ निर्माण केलं होतं.


ज्ञानेश्वर पाटील यांची राजकीय कारकीर्द


सुरुवातीच्या काळात त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. अशा परिस्थितीत त्यांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपवर चालक म्हणून काम केले होते. याच काळात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी शिवसेनेचे कार्य करण्यास सुरुवात केली होती. संघटनेत विविध पदे भूषवित असताना त्यांना 1995 व 1999 साली विधानसभेवर मतदारांनी निवडून दिले होते. तत्पूर्वी ते बिनविरोध नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त रात्री उशिरा धडकताच परंडा मतदारसंघात शोककळा पसरली. 


महत्वाच्या बातम्या:


Osmanabad Renamed : उस्मानाबादचं झालं धाराशिव, काय आहे 25 वर्षांचा इतिहास