नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीचं फायलिंग करताना अनेकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. यानंतर जीएसटी पोर्टल डाऊन असल्याचं समोर आलं. जीएसटीचं दरमहा फायलिंग आणि तिमाही परतावा याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 24 तासांचा वेळ राहिलेला असताना जीएसटी पोर्टल डाऊन झालं. यामुळं उद्योग क्षेत्रामध्ये चिंतेच वातावरण नि्रमाण झालं होतं. जीएसटी फायलिंगची शेवटची तारीख 11 जानेवारी आहे. त्यापूर्वी फायलिंग पूर्ण करण्यापूर्वी अनेकांना अडचणींना सामोरं जावं लागलं. अनेकांना लॉगीन देखील करता येत नव्हतं. गुरुवारपासून जीएसटीच्या पोर्टलला अडचणी असल्याची माहिती आहे.
आज दुपारी तीन वाजेपर्यंत जीएसटीचं पोर्टल डाऊन असेल, असं सांगण्यात आलं आहे. तांत्रिक कारणामुळं शेड्यूल डाऊनटाइम घेण्यात आल्याचा मेसेज जीएसटीच्या वेबसाईटवर पाहाया मिळतो. पोर्टल अजूनही डाऊन असल्यानं उद्योजकांना जीएसटी फायलिंगची प्रक्रिया कशी पूर्ण होणार याची चिंता सतावत आहे.
तांत्रिक अडचणींमुळं व्यावसायिकांना जीएसटी फायलिंग करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर जीएसटी फायलिंगची अंतिम मुदत 13 जानेवारीपर्यंत वाढवली जावी,अशी मागणी केली जात आहे.
जीएसटीच्या अधिकृत अकाऊंटवरुन गुरुवारपासून तांत्रिक अडचणी काही यूजर्सना येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. अनेकांना जीएसटीआर-1 चे रिपोर्ट जनरेट करणे आणि फायलिंग करणे या कामांमध्ये अचणी येत होत्या. जीएसटीच्या वेबसाईटच्या टेक्निकल टीमकडून तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
व्यावसायिकांना जीएसटी फायलिंग करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, असं वाटलं होतं. मात्र, रिटर्न फायलिंग करताना त्यांना अनपेक्षित पणे डाऊनटाइमचा सामना करावा लागत आहे. ज्यांनी शेवटच्या दिवसांमध्ये फायलिंगचा निर्णय घेतला त्यांना समस्यांचा सामना कराव लागत आहे.
दरम्यान, जीएसटी वेबसाईटवरील मेसेजनुसार आज दुपारी तीन वाजेपर्यंत डाऊनटाईम घेण्यात येणार आहे. त्यानंतरच पोर्टल पुन्हा फायलिंगसाठी सुरु होईल, अशी शक्यता आहे.
इतर बातम्या :