एक्स्प्लोर

Indigo : इंडिगोचा प्रवाशांना झटका! या आसनांसाठी मोजावे लागणार 2000 रुपयांचे अतिरिक्त शुल्क

Indigo : इंडिगोने आपल्या विमानातील काही आसनांसाठीच्या दरात वाढ केली आहे.

IndiGo Hikes Charges : देशांतर्गत बाजारपेठेतील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोने (Indigo) आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. इंडिगोने आपल्या काही निवडक आसनांच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कंपनीने 4 जानेवारीलाच भाडे कमी करण्याची घोषणा केली होती. हवाई इंधन शुल्कात (ATF) कपात केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कंपनीने पुन्हा एकदा काही विशिष्ट आसनांच्या प्रवास दरात  वाढ जाहीर केली आहे. आता प्रवाशांना ठराविक सीटवर बसण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.

या आसनांसाठी द्यावे लागणार 2000 रुपयांपर्यंतचे अतिरिक्त शुल्क

सोमवारी याची घोषणा करताना इंडिगोने माहिती दिली आहे की प्रवाशांना समोरच्या सीटसाठी अधिक भाडे द्यावे लागेल. या ठिकाणी लेगरुमसह एक्सएल सीट असते. यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. एअरलाइन्सच्या A320 किंवा A320neo विमानातील 180 किंवा 186 पैकी 18 आसने हे एक्सएल सीट्स असतात. आता या जागांसाठी (विंडो सीट) प्रवाशाला कमाल 2000 रुपये अतिरिक्त भाडे द्यावे लागणार आहे. पुढच्या मधल्या सीटसाठी प्रवाशांना आता 1500 रुपयांपर्यंत अतिरिक्त भाडे द्यावे लागणार आहे. याआधी एअरलाइन्स कंपनी या जागांसाठी 150 ते 1500 रुपये जादा आकारत होती.

इंधन शुल्क रद्द करण्याचा निर्णय

देशातील सर्वात मोठ्या खासगी विमान कंपनी इंडिगोने हवाई इंधनाच्या किमती कमी केल्यानंतर 4 जानेवारी रोजी इंधन शुल्क लागू करण्याचा निर्णय मागे घेतला होता. कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने होत असलेल्या कपातीनंतर सरकारी तेल कंपन्यांनी हवाई इंधनाच्या किमती कमी केल्या.  त्याचा फायदा आता इंडिगो प्रवाशांना देत आहे. कंपनीच्या या घोषणेनंतर, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात इंडिगोचे भाडे 300 ते 1000 रुपयांनी कमी झाले आहे. एअरलाइन्सच्या ऑपरेटिंग खर्चात ATF चा वाटा 40 टक्क्यांपर्यंत असू शकतो.

ऑक्टोबर 2023 मध्ये इंधन शुल्क लागू करण्यात आले होते

हवाई इंधनाच्या किमती वाढल्यानंतर, इंडिगोने ऑक्टोबर 2023 मध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर 300 ते 1,000 रुपयांपर्यंत इंधन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी 1 जानेवारी 2024 पासून हवाई इंधनाच्या किमती 4 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर इंडिगोने इंधन शुल्क लागू करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तरुणांना देशसेवा करण्याची मोठी संधी! अर्ज करण्यास उरला फक्त एक दिवस, जाणून घ्या सविस्तर माहिती 
तरुणांना देशसेवा करण्याची मोठी संधी! अर्ज करण्यास उरला फक्त एक दिवस, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Gold Silver Price: युद्ध थांबताच दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले; चांदीचा भावही झाला कमी, तुमच्या शहरातील आजचे दर किती? जाणून घ्या
युद्ध थांबताच दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले; चांदीचा भावही झाला कमी, तुमच्या शहरातील आजचे दर किती? जाणून घ्या
व्हिएतनामच्या कंपनीकडून महाराष्ट्रात 6.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, 5 हजार एकरवर विविध प्रकल्प उभारणार, 25 हजार रोजगार निर्माण होणार
व्हिएतनामच्या कंपनीकडून महाराष्ट्रात 6.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, 5 हजार एकरवर विविध प्रकल्प उभारणार, 25 हजार रोजगार निर्माण होणार
महागाईच्या काळात 'या' बँकेचा कर्जदारांना मोठा दिलासा, कर्जाचे दर केले कमी, जाणून घ्या सविस्तर माहिती
महागाईच्या काळात 'या' बँकेचा कर्जदारांना मोठा दिलासा, कर्जाचे दर केले कमी, जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Metro 3 : मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
KKR vs LSG : मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली, केकेआरचा तिसरा पराभव
मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली
BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
Iran : होर्मुझवर इराणचं पूर्णपणे नियंत्रण, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एका दिवसात किती जहाज मार्गक्रमण करणार? इराणनं मोठा निर्णय घेतला
अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीनंतर होर्मुझमधून किती जहाजांचं मार्गक्रमण? धक्कादायक आकडेवारी समोर
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
Sanju Samson : संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, नवा कोरा मोबाईल गिफ्ट दिला
संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, कारमधून नवा कोरा मोबाईल काढला अन् गिफ्ट दिला
Embed widget