Stock Market Opening : भारतीय शेअर बाजाराची आज चांगली सुरूवात पाहायला मिळाली. बाजार आज मोठ्या गतीने उघडला असून मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजाराला तेजी आली आहे. बाजार उघडताच सेन्सेक्सने सुरुवातीच्या मिनिटातच 51,900 चा टप्पा पार केला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही आज अर्ध्या टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वाढले आहेत.


कितीने खुलला बाजार?
आज व्यवहाराच्या सुरुवातीला, BSE सेन्सेक्स 299.76 अंकांच्या किंवा 0.58 टक्क्यांच्या वाढीसह 51,897.60 वर उघडला. तर NSE चा निफ्टी 105.80 अंकाने म्हणजेच, 0.69 टक्क्यांच्या वाढीसह 15,455.95 वर उघडला. बाजार उघडताच सेन्सेक्सने सुरुवातीच्या मिनिटातच 51,900 चा टप्पा पार केला.


निफ्टीची सुरुवात कशी झाली?
आजच्या ट्रेडिंगमध्ये, निफ्टीमधील 50 पैकी 49 शेअर्स हिरव्या चिन्हासह व्यवहार करत आहेत, तर फक्त HUL शेअर्स 0.09 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत. आजच्या व्यवहारात बँक निफ्टीतही मोठी उसळी पाहायला मिळत आहे. बँक निफ्टी 191.95 अंकांच्या किंवा 0.59 टक्क्यांच्या वाढीसह 32876 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.


क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती
आजच्या क्षेत्रीय निर्देशांकावर नजर टाकली तर निफ्टीचे सर्व क्षेत्र हिरव्या रंगाच्या तेजीच्या चिन्हासह व्यवहार करत आहेत. याशिवाय मीडिया शेअर्समध्ये सर्वाधिक 2.08 टक्क्यांची उसळी पाहायला मिळत आहे. ग्राहकोपयोगी वस्तू 1.55 टक्क्यांनी वाढल्या आहेत. PSU बँक आणि रियल्टी शेअर्स 1.21-1.21 टक्क्यांच्या मजबूत वाढीसह व्यवहार करत आहेत.


आजचे शेअर्स
आजच्या निफ्टीमध्ये 50 पैकी 49 शेअर्स वाढीसह आहेत, यापैकी हिंदाल्को 2.38 टक्क्यांनी वधारला आहे. टाटा मोटर्सने 2.28 टक्क्यांची झेप घेतली आहे. आयशर मोटर्सने 1.96 टक्क्यांनी उसळी घेतली. JSW स्टील 1.84 टक्क्यांनी आणि टायटनचा स्टॉक 1.76 टक्क्यांनी वर आहे. निफ्टीमध्ये फक्त एचयूएलचा शेअर 0.09 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


भारताची आघाडीची पोलाद कंपनी देत आहे 1750 टक्के डिव्हिडंड, जाणून घ्या एक्स-डिव्हिडंडची तारीख



Insurance : कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी! डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशात विमा योजनेचा केंद्राचा निर्णय