एक्स्प्लोर

Rupee Vs Dollar : रुपयाच्या घसरणीने गाठला ऐतिहासिक नीचांक, डॉलरच्या तुलनेत 79.86 पर्यंत घसरला

Rupee Vs Dollar : डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरू असलेली ऐतिहासिक घसरण सुरू आहे. रुपयाने 79.86 रुपयांची नीचांक गाठला आहे.

Rupee Vs Dollar : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाने आज पुन्हा एकदा ऐतिहासिक नीचांक गाठला. डॉलरच्या तुलनेत रुपयाने 79.86 रुपयांचा स्तर गाठला होता. त्यानंतर काही वेळाने रुपया सावरला असून सध्या 79.84 रुपयाच्या स्तरावर दिसत आहे. बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपयांने 79.81 चा स्तर गाठला होता. 

अमेरिकन डॉलर आणखी मजबूत होत असताना दुसरीकडे परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री यामुळे रुपयात घसरण सुरू आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतलेल्या काही धोरणात्मक निर्णयामुळे रुपया काही प्रमाणात सावरत असल्याचे चित्र होते. मात्र, आता रुपयाची घसरण प्रति डॉलर 80 रुपये होण्याची शक्यता आहे. 

इंटरबँक फॉरेन करेन्सी एक्सचेंज बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीसह 79.84 रुपयांवर व्यवहार करत आहे. त्याआधी 79.86 च्या नीचांकी स्तरापासून फक्त दोन पैशांनी वधारला आहे. 

या दरम्यान अमेरिकन डॉलरची स्थिती दर्शवणारा डॉलर इंडेक्स 0.30 टक्क्यांनी वधारत 108.30 वर आला आहे. ग्लोबल ऑइल इंडेक्स ब्रेंट क्रूड वायदे बाजारात 0.57 टक्क्यांनी वधारत 100.14 डॉलर प्रति बॅरल इतका झाला. 

शेअर बाजारातील आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बुधवारी  2,839.52  कोटींच्या शेअर्सची विक्री केली आहे. 

डॉलर वधारल्याने काय परिणाम होणार?

कच्च्या तेलाची आयात: भारत कच्च्या तेलाची सर्वाधिक आयात करतो. भारतातील इंधनाची गरज भागवण्यासाठी 80 टक्के कच्चे तेल आयात केले जाते. सरकारी इंधन कंपन्यांकडून डॉलरमध्ये कच्च्या तेलाची खरेदी केली जाते. रुपयाच्या तुलनेत डॉलर महाग झाल्यास भारतीय इंधन कंपन्यांना कच्चे तेल खरेदी करण्यासाठी अधिक डॉलर मोजावे लागतील. 
 
परदेशातील शिक्षण महाग: परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खर्चातही वाढ होणार आहे. परदेशातील शिक्षण आणि तेथील वास्तव्याचा खर्च आणखी महाग होण्याची शक्यता आहे. जून ते ऑगस्ट दरम्यान प्रवेश प्रक्रिया सुरू होते. त्यावेळी डॉलरची किंमत वाढते. डॉलरचा दर वधारल्यास पालकांवर आणखी आर्थिक बोजा पडण्याची शक्यता आहे.

मोबाईल लॅपटॉप महाग होणार: ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून सु्ट्टे भाग परदेशातून आयात केले जातात. मोबाईल, लॅपटॉपमध्ये वापरण्यात येणारे अनेक सुट्टे भाग परदेशातून येतात. त्यामुळे रुपयाची घसरण झाल्यास आयात महाग होणार आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
Gold : दिवाळीपूर्वी सोने खरेदी करावं की दिवाळी नंतर, कधी मिळेल जास्त फायदा? जाणून घ्या
दिवाळीपूर्वी सोने खरेदी करावं की दिवाळी नंतर, कधी मिळेल जास्त फायदा? जाणून घ्या
JIO IPO : जिओचा आयपीओ दुसऱ्याच दिवशी 3.47 पट सबस्क्राईब, गुंतवणूकदारांकडून 3.5 लाख कोटींची बोली
जिओचा आयपीओ दुसऱ्याच दिवशी 3.47 पट सबस्क्राईब, गुंतवणूकदारांकडून 3.5 लाख कोटींची बोली

व्हिडीओ

Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
Sanju Samson : संजू सॅमसनचा आक्रमक फलंदाजीचा धडाका सुरुच, पहिल्या टी 20 मध्ये अर्धशतकी खेळी, विराट कोहलीचा विक्रम संकटात
संजू सॅमसनचा आक्रमक फलंदाजीचा धडाका सुरुच, पहिल्या टी 20 मध्ये अर्धशतकी खेळी, विराट कोहलीचा विक्रम संकटात
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
Embed widget