Indian Railways : भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) मालवाहतुकीत (freight) यावर्षी मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारी 2024 पर्यंत देशात 1434.03 टन मालवाहतूक केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीतील मालवाहतुकीशी तुलना करता यावर्षी 66.51 टन अधिक मालवाहतूक झाली आहे. एप्रिल 2023 ते फेब्रुवारी 2024 या काळात रेल्वेने मालवाहतुकीतून 1,55,557.1 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. 


एप्रिल 2023 ते फेब्रुवारी 2024 या काळातील एकत्रित आकडेवारीनुसार, भारतीय रेल्वेने गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 1367.5 टन मालवाहतुकीच्या तुलनेत यावर्षी 1434.01 टन मालवाहतूक केली आहे.  गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या मालवाहतुकीच्या तुलनेत यावर्षी अंदाजे 66.51 टन इतकी जास्त मालवाहतूक झाली आहे. भारतीय रेल्वेने यावर्षी मालवाहतुकीतून 155557.1 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या 149088.1 कोटी रुपयांच्या उत्पन्नाच्या तुलनेत यावर्षी रेल्वेच्या उत्पन्नात सुमारे 6468.17 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये रेल्वेने 136.60 टन मालवाहतूक केली आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत यावर्षी मालवाहतुकीमध्ये 10.13 टक्क्यांची सुधारणा झाली आहे.


फेब्रुवारीत मालवाहतुकीतून रेल्वेला मिळाला 14931.89 कोटी रुपयांचा महसूल


फेब्रुवारी 2024 मध्ये मालवाहतुकीद्वारे रेल्वेला 14931.89 कोटी रुपये इतका महसूल मिळाला आहे. तर फेब्रुवारी 2023 मध्ये रेल्वेला 13700.75 कोटी रुपये इतका महसूल मिळाला होता. यातून गेल्या वर्षीच्या तुलनेत रेल्वेला यावर्षी मिळालेल्या महसुलात 8.98 टक्के इतकी सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये भारतीय रेल्वेने 59.08 टन कोळसा, 15.11 टन लोह खनिज, 5.69 टन पिग आयर्न आणि फिनिश्ड स्टील, 7.59  टन सिमेंट (क्लिंकर वगळता), 5.45 टन क्लिंकर,  5.10 टन अन्नधान्य, 3.962 टन खते, 4.06 टन खनिज तेल,  कंटेनरच्या स्वरुपात 7.00MT टन आणि उर्वरित वस्तूंच्या स्वरूपात 10.66 टन मालवाहतूक केली.


भारतीय रेल्वेने व्यवसाय करण्यातील सुलभता वाढवण्यासाठी तसेच स्पर्धात्मक दरांमध्ये सेवा वितरणात सुधारणा करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. ग्राहक केंद्रित दृष्टीकोन आणि लवचिक धोरण आखणीचे पाठबळ असलेल्या व्यवसाय विकास केंद्रांचे कार्य यामुळे भारतीय रेल्वेला हे मोठे यश मिळवण्यात मदत झाली.


अमृत ​​भारत स्टेशन योजनेंतर्गत रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण


अमृत ​​भारत स्टेशन योजनेंतर्गत रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. रेल्वे स्थानकांसाठी मास्टर प्लॅन तयार करून सुविधांमध्ये वाढ करणे हा या योजनेचा उद्देश आहे. यामध्ये वेटिंग रूम, उत्तम कॅफेटेरिया आणि किरकोळ सुविधा विकसित केल्या जात आहेत. याशिवाय व्यासपीठही विकसित केले जात आहे. रुंद रस्ते, संकेतस्थळ, पदपथ, पार्किंग क्षेत्र आणि प्रकाश व्यवस्था विकसित केली जाईल


महत्वाच्या बातम्या:


554 रेल्वे स्टेशन होणार आधुनिक, 41 हजार कोटी रुपये खर्च: उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन