एक्स्प्लोर

Share Market : इराण-अमेरिका युद्ध थांबताच शेअर बाजारात सर्वात मोठी उसळी, सेन्सेक्स 2500 अंकांनी वधारला, निफ्टीचा वरच्या दिशेने सुस्साट प्रवास

Share Market : प्री-ओपनिंग सत्रातच सेन्सेक्सने तब्बल २७०० हून अधिक अंकांची ऐतिहासिक झेप घेतल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मुंबई: जागतिक राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडींचे सकारात्मक पडसाद आज भारतीय शेअर बाजारात (Share Market) उमटले आहेत. युद्धाच्या छायेखाली असलेल्या जगाला 'सीझफायर'च्या (युद्धविराम) निर्णयाने मोठा दिलासा मिळाल्याने आज भारतीय शेअर बाजार एका मोठ्या उसळणीसह उघडला. प्री-ओपनिंग सत्रातच सेन्सेक्सने तब्बल २७०० हून अधिक अंकांची ऐतिहासिक झेप घेतल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.(Share Market) युद्धविरामानंतर भांडवली बाजारात तेजी आल्याचं दिसून येत आहे. सेन्सेक्समध्ये २ हजार ७०० अंकांची उसळी तर निफ्टी ७५० अंकांनी वधारला आहे. आयटी, मेटल, रिअॅल्टी क्षेत्रातील समभागात मोठी तेजी दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या भावात देखील मोठी घसरण झाली आहे, १३ टक्क्यांनी दर पडले आहेत. कच्च्या तेलाचे भाव ९५ डाॅलर प्रति बॅरलवर आले आहेत. अदानी पोर्ट, इंडिगोच्या समभागात मोठी उसळी पहायला मिळत आहे.

Share Market :  काय आहे तेजीचे मुख्य कारण?

जागतिक स्तरावर सुरू असलेल्या संघर्षात 'सीझफायर' म्हणजेच युद्धविरामाची घोषणा झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सकारात्मक संकेत मिळाले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली स्थिरता आणि जागतिक पुरवठा साखळी पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाल्याने जगभरातील शेअर बाजारांनी या निर्णयाचे स्वागत केले. याचाच थेट परिणाम आज मुंबई शेअर बाजाराच्या (BSE) सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (NSE) निफ्टीवर दिसून आला.

Share Market :  सेन्सेक्सची झेप: प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स २७०० पेक्षा जास्त अंकांनी वधारला.

Share Market :  निफ्टीमध्येही तेजी: निफ्टीनेही मोठी पातळी ओलांडत गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला.

Share Market :  जागतिक परिणाम: आशियाई आणि युरोपियन बाजारातील तेजीचा भारतीय बाजाराला पाठिंबा मिळाला.

तज्ज्ञांच्या मते, जर सीझफायरची स्थिती कायम राहिली आणि जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित झाली, तर भारतीय शेअर बाजार येत्या काही दिवसांत नवे उच्चांक प्रस्थापित करू शकतो. 

Share Market :  दोन्ही देशांनी सैन्य कारवाया दोन आठवड्यांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला 

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध (Iran US War) अखेर आज थांबलं आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला संघर्ष अखेर थांबला असून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांनी सैन्य कारवाया दोन आठवड्यांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री, सय्यद अब्बास अराघची, यांनी देखील एक्सवर पोस्ट करुन वृत्ताला दुजोरा दिला आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वतीने निवेदन जारी करत अराघची यांनी दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी करण्यात आल्याचे मान्य केले आहे. 

इराणनं दिलेला 10 अटींचा मसुदा मान्य करण्यासारखा असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. तर होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची अट अमेरिकेने घातली होती. या अटीला इराणनेदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला. इराण हॉर्मुझ पूर्णपणे आणि लगेच खुलं करायला तयार झाल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबवण्यात चीन आणि पाकिस्तानने मध्यस्थी केल्याचं बोललं जात आहे. तसेच इराणने पाकिस्तानमार्फत अमेरिकेकडे एक सविस्तर प्रस्ताव पाठवला आहे. जो आता अमेरिकन बाजू वाटाघाटीसाठी पुढे करणार आहेत. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाली असून 10 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरु होईल. (Iran US War Ceasefire)

आशियाई बाजारपेठांमध्ये जबरदस्त उत्साह

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यास संमती दिल्यानंतर आणि कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे आज आशियाई बाजारपेठांमध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळत आहे. जपानच्या निक्केई २२५ (Nikkei 225) मध्ये १.७९ टक्क्यांची उसळण दिसून आली, तर टॉपिक्स (Topix) मध्ये १.६९ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. दक्षिण कोरियाच्या कोस्पी (Kospi) मध्ये ५.९९ टक्के आणि स्मॉल-कॅप कोस्डॅक (Kosdaq) मध्ये सुमारे ५ टक्क्यांची तेजी आली आहे.

कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil Price)

वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) क्रूड फ्युचर्स १४ टक्क्यांनी घसरून ९७.४९ डॉलर प्रति बॅरलवर आले आहे, जे १०० डॉलरच्या मानसशास्त्रीय पातळीच्या खाली आहे. याचा अर्थ असा की, बाजारपेठेला आता युद्धाची तातडीची भीती उरलेली नाही. ब्रेंट क्रूड फ्युचर्स आज सकाळी १३ टक्क्यांनी घसरून ९५.६३ डॉलरवर आले आहे. COMEX वर कच्च्या तेलाच्या किमतीत १३.३३ टक्क्यांची घसरण झाली असून ते ९७.८९० डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे.

संबंधित बातमी:

Iran US War Ceasefire: पाकिस्तान-चीनची मध्यस्थी, 10 कलमी अटी...; इराण नष्ट करु म्हणणारे डोनाल्ड ट्रम्प मागे का हटले?, नेमकं काय घडलं?

Iran US War Ceasefire मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

अंकिता शांतीनाथ खाणे या मूळच्या पंढरपूर येथील आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ६ वर्षांचा अनुभव असलेल्या त्या पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण घेत असतानाच प्रोड्युसर म्हणून स्टार महाराष्ट्र वृत्तवाहिनीसोबत कामाला सुरूवात केली. तिथे दीड वर्षे काम केल्यानंतर सकाळमधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर सकाळमध्ये सुमारे २ वर्षे काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. तिथे राजकीय, गुन्हेगारी आणि शेअर बाजार विषयावर लिहिण्याचे काम केले. गेल्या २.५ वर्षांपासून त्या ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

सुरुवातीला तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि सामाजिक विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष आवड आहे. एखादी मोठी, महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या लिहिण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे, अशा विविध जबाबदाऱ्या त्या पार पाडत आहेत. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्या विशेष भर देतात.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate Today : आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
सोनं खरेदी करावं की नको? महिनाभरात सोन्याच्या दरात तब्बल 22 हजारांची घसरण, सध्या काय आहेत दर? 
सोनं खरेदी करावं की नको? महिनाभरात सोन्याच्या दरात तब्बल 22 हजारांची घसरण, सध्या काय आहेत दर? 
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला
Gold Silver Price Today: सोने-चांदी पुन्हा महागलं, 24 तासांत सोनं तीन हजारांनी ‌‌‌‌‌‌‌वधारलं; तर चांदी प्रतितोळ्याचा दर काय?
सोने-चांदी पुन्हा महागलं, 24 तासांत सोनं तीन हजारांनी ‌‌‌‌‌‌‌वधारलं; तर चांदी प्रतितोळ्याचा दर काय?

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद
Rohit Pawar Delimitaion: शरद पवारांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांची डिलिमिटेशन विधेयकावर प्रतिक्रिया; राष्ट्रवादी (एसपी) पाठिंबा देणार की नाही?
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांची डिलिमिटेशन विधेयकावर प्रतिक्रिया; राष्ट्रवादी (एसपी) पाठिंबा देणार की नाही?
Embed widget