Indian Tech Sector: भारताने अमेरिकेच्या अर्थव्यस्थेला मोठा आधार दिला आहे. मागील वर्षी भारतातील टेक सेक्टरने तब्बल 2,07,000 अमेरिकन बेरोजगारांना नोकरी दिली आहे. या कर्मचाऱ्यांना सरासरी 106,360 डॉलर्स पगार देण्यात आला आहे. ज्यामुळे अमेरिकेच्या तिजोरीत 103 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे, अशी माहिती नॅसकॉमच्या नवीन अहवालात प्रसिद्ध करण्यात आली आहे.    


भारतीय टेक सेक्टरमुळे आतापर्यंत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला एकूण 396 अब्ज डॉलर्सची मदत झाली आहे. तसेच आतापर्यंत 16 लाख अमेरिकन नागरिकांना या सेक्टरमध्ये नोकरी देण्यात आली आहे. 2021 मध्ये अमेरिकेतील 20 राज्यांच्या एकत्रित महसुलात भारताने 198 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्तीचे योगदान दिले आहे, अशी माहिती नॅसकॉम आणि  IHS Markit ( Nassom and IHS Markit) अहवालात देण्यात आली आहे.      


नॅसकॉमचे अध्यक्ष देबजानी घोष म्हणजे की, "भारतीय टेक सेक्टर 500 कंपन्यांपैकी 75 टक्क्यांहून अधिक कंपन्यांसोबत काम करत आहे. त्यापैकी बहुतेकांचे मुख्यालय अमेरिकेत आहे. त्यामुळे डिजिटल युगातील नवनवीन तंत्रज्ञानातील कौशल्यात्मक आव्हाने समजून घेण्यासाठी आणि त्यांना तोंड देण्यासाठी ते सुसज्ज आहेत."


भारतीय टेक कंपन्यांनी अमेरिकेत आपला पाया मजबूत करण्यासाठी सुमारे 180 विद्यापीठे, महाविद्यालये, सामुदायिक महाविद्यालये आणि इतरांसह 1.1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त योगदान देत भागीदारी केली आहे. याची सुरुवात करण्यासाठी भारतीक टेक कंपन्यांनी K-12 उपक्रमात 3 मिलियन डॉलर्सची तरतूद केली आहे. याचा फायदा अमेरिकेतील सुमारे 29 लाख विद्यार्थी आणि शिक्षकांना होत आहे.    


घोष म्हणाले आहेत की, ''भारतीय टेक कंपन्यांनी स्थानिकांमध्ये नवकल्पना वाढवण्यासाठीच्या उपक्रमात गुंतवणूक केली आहे. तसेच स्थानिक कर्मचाऱ्यांचे कौशल्य विकास सक्षम करून अमेरिकन अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.''


इतर महत्वाच्या बातम्या: 


China Economics : चीनमध्ये लॉकडाउनचे सावट; 15 दिवसांपासून शेअर बाजारात मोठी घसरण
Share Market Updates : शेअर बाजारात पडझड सुरूच, सेन्सेक्स आजही 372 अंकांनी घसरला