मुंबई: भारत आणि ओमान यांच्यात मोठा करार होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे गॅसोलीन, लोह आणि पोलाद, इलेक्ट्रॉनिक्स आणि यंत्रसामग्री यांसारख्या 3.7 अब्ज डॉलर्स किमतीच्या 83.5 टक्क्यांहून अधिक भारतीय वस्तूंना ओमानची बाजारपेठ खुली होणार आहे. ग्लोबल ट्रेड रिफॉर्म इनिशिएटिव्ह (GTRI) या संशोधन संस्थेने तयार केलेल्या India-Oman CEPA: Gateway to Middle Eastern Markets and Beyond नुसार, या वस्तूंवर सध्या ओमानमध्ये पाच टक्के आयात शुल्क आकारले जाते. आता तो कर कमी करण्यात येणार आहे.
अहवाल काय म्हणतो?
भारत आणि ओमान यांच्यात या आर्थिक भागीदारी करारावर (CEPA) वाटाघाटी सुरू आहेत. या कराराच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असून दोन्ही देश त्यांच्यामध्ये सहमत असलेल्या जास्तीत जास्त वस्तूंवरील सीमा शुल्क लक्षणीयरीत्या कमी करत आहेत किंवा काढून टाकत आहेत. अहवालात म्हटले आहे की, नवीन व्यापार करारामुळे मोटार गॅसोलीन ( 1.7 अब्ज डॉलर्स किमतीची निर्यात), लोह आणि पोलाद उत्पादने (235 दशलक्ष डॉलर्स किमतीची निर्यात), इलेक्ट्रॉनिक्स (135 दशलक्ष डॉलर्स किमतीची निर्यात), यंत्रसामग्री (125 दशलक्ष डॉलर्स किमतीची निर्यात) या प्रमुख निर्यात वस्तूंना चालना मिळेल.
तसेच अॅल्युमिनियम ऑक्साईड (126 दशलक्ष डॉलर्स), कापड (110 दशलक्ष डॉलर्स), कॅलक्लाइंड अॅल्युमिना (105 दशलक्ष डॉलर्स), प्लास्टिक (64 दशलक्ष डॉलर्स), बोनलेस मीट (50 दशलक्ष डॉलर्स), आवश्यक तेले (47 दशलक्ष डॉलर्स) आणि मोटार कार (28 दशलक्ष डॉलर्सची निर्यात) भारतासाठी अत्यंत फायदेशीर ठरतील.
या उत्पादनांना नवी दिशा मिळेल
असं असलं तरी भारतातून ओमानला निर्यात होणाऱ्या सुमारे 16.5 टक्के मालाला या कराराचा अतिरिक्त लाभ मिळणार नाही, असे त्यात म्हटले आहे. त्यांची निर्यात सुमारे 800 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे आणि या वस्तूंना आधीच शुल्क मुक्त प्रवेश आहे. यामध्ये गहू (45 दशलक्ष डॉलर्स किमतीची निर्यात), बासमती तांदूळ (125 दशलक्ष डॉलर्स), फळे, भाजीपाला (76 दशलक्ष डॉलर्स), औषधे (76 दशलक्ष डॉलर्स), मासे (13.7 दशलक्ष डॉलर्स), चहा, कॉफी यांचा समावेश आहे. (1.77 कोटी अमेरिकन डॉलर) यांचा समावेश आहे.
अमेरिका भारताचा सर्वात मोठा भागिदार
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर 2023 दरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार 59.67 अब्ज डॉलर्स इतका झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर 2022 या कालावधीत ते 67.28 अब्ज डॉलर होते, याचा अर्थ भारत आणि अमेरिका यांच्यातील परस्पर व्यापार एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 11.3 टक्क्यांनी कमी झाला आहे.
ही बातमी वाचा: