India's growth: कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन संकटादरम्यानही भारताची अर्थव्यवस्था बळकट परिस्थितीत असल्याचं पाहायला मिळत आहे. आयएमएफने म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात भारत सर्वात वेगाने प्रगती करत आहे. या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 8.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे.
विकास दर 8.2 टक्के अपेक्षित
आईएमएफ वर्ल्ड आउटलुकनुसार, भारताचा विकास दर या आर्थिक वर्षात 8.2 टक्के आणि पुढील वर्षी 6.9 टक्के राहण्याचा अंदाज आहे. या आर्थिक वर्षाच्या अंदाजानुसार, भारत सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. परंतु जानेवारीपासून विकास दर (0.8 टक्के गुण) मंदावला आहे. आईएमएफ वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकनुसार, चालू आणि पुढील आर्थिक वर्षात जागतिक उत्पादनात 3.6 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.
अर्थमंत्र्यांनी क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांची भेट घेतली
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच एमडी क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांची भेट घेतली. या बैठकीत भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंत व्ही नागेश्वरन आणि आईएमएफच्या गीता गोपीनाथ यांसारखे भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले होते.
महत्वाच्या बातम्या :
- Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणतात; क्रिप्टोकरन्सी देशांसाठी मोठा धोका
- Gold Rate Today : सोन्याच्या किमतीत किरकोळ वाढ; जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे दर
- EPFO मध्ये सॅलरी लिमिट 15 हजारांवरून 21 हजार करण्याचा विचार; कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होणार फायदा
- GST : जीएसटीतून 5 टक्के कराचा टप्पा वगळला जाणार? GST परिषदेत 'हे' निर्णय होण्याची शक्यता
- Upcoming IPO: पैसे कमावण्याची नामी संधी! या दोन कंपन्यांचे येत आहेत आयपीओ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha