Kaynes Technology IPO: जर तुम्हीही येत्या काही दिवसांत IPO मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. येत्या काही दिवसांमध्ये अनेक कंपन्या आपले IPO बाजारात आणणार आहेत. अशातच इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम आणि डिझाइन मॅन्युफॅक्चरिंग सेवा कंपनी केनेस टेक्नॉलॉजीने प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) द्वारे पैसे उभारण्यासाठी स्टॉक मार्केट रेग्युलेटर सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत. या IPO च्या माध्यमातून 650 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे.


650 कोटी नवीन शेअर्स जारी केले जातील


ड्राफ्ट रेड हेरिंग फॉरमॅट (DRHP) नुसार, या IPO अंतर्गत  650 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील आणि 7.2 कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकाद्वारे केली जाईल.


OFS द्वारे देखील ऑफर केले जाईल शेअर्स 


OFS अंतर्गत, प्रवर्तक रमेश कुन्हीकन्नन 37 लाख इक्विटी शेअर्स आणि शेअरहोल्डर फ्रेन्झी फिरोज 35 लाख इक्विटी शेअर्सची विक्री करणार आहेत. या इक्विटी शेअर्समधील 1.5 कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतील.


पैसा कुठे वापरणार?


ही कंपनी IPO मधून मिळालेल्या रकमेपैकी सुमारे 130 कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि 98.93 कोटी रुपये म्हैसूर आणि मानेसरमधील उत्पादन केंद्रांसाठी भांडवली खर्चासाठी वापरले जातील. तसेच कंपनीच्या उपकंपनी कान्स इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 140.30 कोटी रुपये निवेश केले जातील.


Senco Gold चा IPO देखील लवकरच येत आहे


ज्वेलरी रिटेलर कंपनी Senco Gold देखील IPO आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने IPO च्या मंजुरीसाठी स्टॉक मार्केट रेग्युलेटर SEBI कडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे. सेन्को गोल्ड आयपीओद्वारे बाजारातून 525 कोटी रुपये उभारू शकते.


इतर महत्वाच्या बातम्या: 


IPO: तब्बल 45 देशांमध्ये व्यवसाय असलेली केमिकल कंपनी भारतात आयपीओ आणणार