Nirmala Sitharaman : क्रिप्टोकरन्सीवरुन (Cryptocurrencies) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. देशांसाठी क्रिप्टोकरन्सीचा सर्वात मोठा धोका असल्याचे निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे. दहशतवासाठी वित्तपुरवठा आणि मनी लॉन्ड्रिंगसाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर होत असल्याचं मत सीतारमण यांनी व्यक्त केलं आहे.


आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) आयोजित केलेल्या 'स्प्रिंग मीट' या चर्चासत्रात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोकरन्सीवरबाबत हा व्यक्त केला आहे. अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्रात सहभागी झालेल्या सर्व सदस्य देशांसाठी क्रिप्टोकरन्सीचा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 


क्रिप्टोकरन्सीच्या धोक्यावर तंत्रज्ञानाद्वारे नियमन हे एकमेव उत्तर असल्याचे सीतारमण यांनी यावेळी स्पष्ट केलं. यासाठी तंत्रज्ञानाचे नियमन अशा पद्धतीने विकसित करायण्याची गरज आहे की, काही गोष्टी आपल्या नियंत्रणात राहतील आणि जर कोणत्याही देशाला हे एकट्याने हाताळणे अशक्य असेल तर यासाठी सर्व देशांना एकत्रितपणे काम करावे लागेल, असं सीतारमण यांनी म्हटलं आहे. 


ट्रेस ट्रान्झॅक्शनवर कर लागू


क्रिप्टोकरन्सीद्वारे व्यवहार करणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने 30 टक्के कर लावला असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. याद्वारे या व्यवहारात कोण-कोण सहभागी आहेत हे कळू शकेल. त्याचप्रमाणे  इलेक्ट्रॉनिक कोडमध्ये होणारे हे व्यवहार ट्रॅक करण्यासाठी आम्ही त्यावर कर लादला. जेणेकरून ते कोण विकत आहे आणि कोण विकत घेत आहे हे कळू शकेल अशीही माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. 


भारतात डिजिटलायझेशन


याच बैठकीत निर्मला सीतारामण यांनी गेल्या काही वर्षांत भारताने डिजिटलायझेशनच्या दिशेने उचललेल्या पावलांचाही उल्लेख केला. तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात भारताने चांगली कामगिरी केल्याचेही त्यांनी सांगितले. 2019 चा डेटा पाहिला तर भारतात डिजिटलायझेशनचा दर 95 टक्के होता, तर त्याच काळात जगभरात 64 टक्के होता. महामारीने आम्हाला तंत्रज्ञान वापरण्यास सोपं असल्याचं शिकवलं आहे आणि सामान्य माणूस ते सहजपणे वापरू शकतो हे ही दाखवल्याचं अर्थमंत्री यावेळी म्हणाल्या. 


सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम


भारतात सध्या सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आहे. भारतातील 4 पैकी 1 स्टार्टअप फिनटेक होत असून सतत युनिकॉर्न होत असल्याचा सीतारमण यांचा दावा आहे. अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन-चार वर्षांत देशात सुमारे 20 स्टार्टअप युनिकॉर्न बनले आहेत. (याचे बाजार मूल्य 1 बिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे.) 


महत्वाच्या बातम्या


सायबर तज्ज्ञ म्हणून काम, पोलिसांना 10 खटल्यात मदत, पठ्ठ्याने बिटकॉईन घोटाळ्यात पुणे पोलिसांनाच गंडवलं!