Index of Industries :  देशातील आठ प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात (Index of Industries) (आयसीआय)  वाढ झाली आहे. मार्च 2023 मधील निर्देशांकाच्या तुलनेत, मार्च 2024 मध्ये, 5.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सिमेंट, कोळसा, वीज, नैसर्गिक वायू, पोलाद, आणि कच्च्या तेलाच्या उत्पादनात मार्च 2024 मध्ये सकारात्मक वाढीची नोंद झालीय. 


आयसीआय हा देशातील सिमेंट, कोळसा, कच्चे तेल, वीज, खते, नैसर्गिक वायू, रिफायनरी  उत्पादने आणि पोलाद अशा महत्त्वाच्या आठ उद्योगांमधील उत्पादनाच्या एकत्रित आणि वैयक्तिक कामगिरीचे मोजमाप करणारा निर्देशांक आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (आयआयपी) समाविष्ट करण्यात आलेल्या एकूण बाबींमध्ये, या आठ प्रमुख उद्योगांचा वाटा 40.27 टक्के इतका आहे. देशातील आठ प्रमुख उद्योगांचा डिसेंबर 2023 साठीचा सुधारित अंतिम वृद्धी दर 5.0 टक्के आहे. वर्ष 2023-24 दरम्यान आयसीआयचा एकत्रित विकासदर मागील वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 7.5 टक्के (तात्पुरता) इतका नोंदवण्यात आला आहे.


देशातील महत्त्वाच्या आठ उद्योगांच्या निर्देशांकाचा सारांश 


सिमेंट


सिमेंट उत्पादन (भार  : 5.37 टक्के) मार्च 2023 च्या तुलनेत, मार्च 2024 मध्ये 10.6 टक्क्यांनी वाढले. सिमेंटचा एकत्रित  निर्देशांक वर्ष 2023-24 दरम्यान त्याआधीच्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 9.1 टक्क्यांनी वाढला आहे. 


कोळसा 


कोळसा उत्पादन (भार  : 10.33 टक्के) मार्च 2023 च्या तुलनेत मार्च 2024 मध्ये 8.7 टक्क्यांनी वाढले. कोळशाचा एकत्रित निर्देशांक वर्ष 2023-24 दरम्यान त्याआधीच्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 11.7 टक्क्यानी वाढला.


कच्चे तेल


कच्च्या तेलाचे उत्पादन (भार : 8.98 टक्के) मार्च 2023 च्या तुलनेत मार्च 2024 मध्ये 2.0 टक्क्यांनी वाढले. कच्च्या तेलाचा एकत्रित निर्देशांक 2023-24 दरम्यान त्याआधीच्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 0.6 टक्क्यानी वाढला.


वीज 


वीज निर्मिती (भार : 19.85 टक्के) मार्च, 2023 च्या तुलनेत मार्च, 2024 मध्ये 8.0 टक्क्यांनी वाढली. त्याच्या एकत्रित निर्देशांकात 2023-24 मध्ये मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 7.0 टक्क्यांनी वाढ झाली.


खते 


खते उत्पादन (भार : 2.63 टक्के) मार्च 2023 च्या तुलनेत मार्च 2024 मध्ये 1.3 टक्क्यांनी घटले. त्याच्या एकत्रित निर्देशांकात 2023-24 मध्ये मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 3.7 टक्क्यांनी वाढ झाली.


नैसर्गिक वायू 


नैसर्गिक वायूचे उत्पादन (भार : 6.88 टक्के) मार्च, 2023 च्या तुलनेत मार्च, 2024 मध्ये 6.3 टक्क्यांनी वाढले. त्याच्या एकत्रित निर्देशांकात 2023-24 मध्ये मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 6.1 टक्क्यांनी वाढ झाली.


पेट्रोलियम रिफायनरी उत्पादने 


पेट्रोलियम रिफायनरी उत्पादन (भार : 28.04 टक्के) मार्च, 2023 च्या तुलनेत मार्च, 2024 मध्ये 0.3 टक्क्यांनी घसरले. त्याच्या एकत्रित निर्देशांकात 2023-24 मध्ये मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 3.4 टक्क्यांनी वाढ झाली.


पोलाद


पोलाद उत्पादन (भार : 17.92 टक्के) मार्च, 2023 च्या तुलनेत मार्च, 2024 मध्ये 5.5 टक्क्यांनी वाढले. त्याच्या एकत्रित निर्देशांकात 2023-24 मध्ये मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 12.3 टक्क्यांनी वाढ झाली.