Petrol and Diesel Prices : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत (crude oil prices) 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यानंतर आखाती देशांचे कच्चे तेल प्रति बॅरल 84 डॉलरच्या आसपास पोहोचले आहे. दुसरीकडे, अमेरिकन कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 80 डॉलरच्या जवळपास पोहोचल्या आहेत. त्यामुळं देशात पुन्हा पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? अशी चर्चा सुरु आहे. देशाच्या प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काय? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 


कच्च्या तेलाच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता


कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आखाती देशांच्या कच्च्या तेलाची किंमत 84 डॉलर आणि अमेरिकन कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 80 डॉलरवर पोहोचली आहे. येत्या काही दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. होय, 12 तेल उत्पादक देशांची संघटना असलेल्या OPEC येत्या काही दिवसांत असा निर्णय घेऊ शकते, ज्यामुळे जगातील इतर देशांवर मोठा तणाव निर्माण होऊ शकतो. त्या निर्णयाचा परिणाम भारतासारख्या देशांवर अधिक दिसून येईल जे आवश्यकतेच्या 85 टक्के तेल आयात करतात. विशेष म्हणजे 8 फेब्रुवारीनंतर आखाती देशांचे कच्चे तेल प्रति बॅरल 80 डॉलरच्या खाली गेलेले नाही. OPEC चे 12 देश घेणार असलेल्या निर्णयामुळे किंमत प्रति बॅरल 90 डॉलरपर्यंत पोहोचू शकते.


भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल नाही


दरम्यान, आज भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तज्ज्ञांच्या मते, लोकसभा निवडणूक असूनही, तेल विपणन कंपन्या आणि सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याचे कोणतेही संकेत नाहीत. पुढील तिमाहीत कच्च्या तेलाच्या उत्पादनात ऐच्छिक कपात वाढवण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे आखाती देशांचे ब्रेंट क्रूड तेल 1.64 डॉलर किंवा 2 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 83.55 डॉलरवर बंद झाले. दुसरीकडे, अमेरिकन क्रूड ऑइल यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (डब्ल्यूटीआय) 1.71 डॉलर किंवा 2.19 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल  79.97 डॉलरवर पोहोचले. कराराच्या महिन्यांतील बदलानंतर, ब्रेंट क्रूड ऑइलमध्ये सुमारे 2.4 टक्के वाढ दिसून आली आहे. तर WTI मध्ये 4.5 टक्के वाढ झाली आहे.


भारतात तणाव वाढणार का? 


OPEC+ ने उत्पादन कपात आणखी वाढवली तर भारतासारख्या देशांच्या समस्या आणखी वाढू शकतात. भारतासह जगातील अनेक देश 80 ते 84 टक्के कच्चे तेल आयात करतात.  ध्या कच्च्या तेलाची खरेदी डॉलरमध्ये केली जाते. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर आणखी डॉलर मोजावे लागतील. यामुळे अशा देशांचे आयात बिल तर वाढेलच पण स्थानिक चलनाचेही नुकसान होईल. देशाच्या अर्थव्यवस्थेवरही याचा विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे स्थानिक तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करावी लागणार आहे. त्यामुळे देशात महागाई वाढणार आहे.


भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशातील महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील शेवटचा बदल 21 मे 2022 रोजी दिसला होता. त्यावेळी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरील कर कमी केला होता. त्यानंतर काही राज्यांनी व्हॅट कमी करून किंवा वाढवून किमतींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे जेव्हापासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारानुसार रोज बदलू लागल्या आहेत, तेव्हापासून पेट्रोलियम कंपन्यांनी विक्रमी वेळेत कोणताही बदल केलेला नाही.


प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर काय?


नवी दिल्ली - पेट्रोलचा दर - 96.72 रुपये प्रति लिटर, डिझेलचा दर - 89.62 रुपये प्रति लिटर
कोलकाता - पेट्रोल - 106.03, डिझेल - 92.76 
मुंबई - पेट्रोल - 106.31, डिझेल- 94.27 
चेन्नई - पेट्रोल- 102.63, डिझेल - 94.24 
बंगळुरु - पेट्रोल - ​​101.94, डिझेल - ​​87.89 
चंदीगड - पेट्रोल - 96.20, डिझेल - 84.26 
गुरुग्राम - पेट्रोल - ​​97.18, डिझेल - ​​90.05
लखनौ - पेट्रोल- 96.57, डिझेल - 89.76 ट
नोएडा - पेट्रोल - ​​96.79 , डिझेल - ​​89.96 


महत्वाच्या बातम्या:


कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण, पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार का?