Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किंमतीत (crude oil prices) 2.50 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आली. यामुळं भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घसरण होणार का? अशी चर्चा सुरु आहे. मात्र, सध्या भारतात पेट्रोल आण डिझेलच्या दरात कोणतीही घसरण झालेली नाही. यूएस सेंट्रल बँकेने दिलेल्या माहितीनुसार, व्याज कमी करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. त्यामुळं कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. 


व्याजदर कपातीसाठी सर्वसामान्यांना करावी लागणार प्रतीक्षा 


सध्या पॉलिसी रेटमध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल होणार नसल्याची माहिती यूएस सेंट्रल बँकेने दिली आहे. व्याजदर कपातीसाठी सर्वसामान्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते. त्यामुळं डॉलरच्या निर्देशांकात वाढ आणि कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. आखाती देशांच्या तेलाशिवाय अमेरिकन तेलाच्या किमतीतही घसरण झाली आहे. अमेरिकन तेलाच्या साठ्यातही वाढ झाल्याचे वृत्त आहे. त्याचा परिणाम तेलाच्या दरावरही दिसून आला आहे. मध्य पूर्वेतील तणाव अजून संपलेला नाही. पण फेड आणि इन्व्हेंटरीज या दोन ट्रिगर्सनंतर कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली आहे.


भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर कोणताही परिणाम नाही


दरम्यान, सध्या भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर कोणताही परिणाम झालेला नाही. जवळपास दोन वर्षानंतरही इंधनाचे दर स्थिर आहेत. गेल्या वेळी तेल विपणन कंपन्यांनी एप्रिल आणि डिझेलच्या दरात बदल केला होता. तर मे 2022 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कमी कर सवलत देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर कोणताही बदल झालेला नाही. तेव्हापासून कच्च्या तेलाच्या किमतीत 40 ते 50 टक्क्यांच्या दरम्यान घसरण झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांत तेल कंपन्यांचा नफा 69 हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो चालू आर्थिक वर्षात 90 हजार कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यानंतरही इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 


कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी घसरण होण्याची शक्यता 


मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजार बंद झाला तोपर्यंत कच्च्या तेलाच्या किमतीत अडीच टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती. ब्रेंट क्रूड, आखाती देशांचे कच्चे तेल 2.45 टक्क्यांनी घसरले आहे. म्हणजे 2 डॉलर प्रति बॅरलपेक्षा जास्त 81.62 डॉलर प्रति बॅरल आहे. गेल्या 12 व्यापार दिवसांपासून ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल 80 डॉलरपेक्षा जास्त आहे. दुसरीकडे, अमेरिकन कच्च्या तेलाच्या किमतीतही घसरण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.


दुसरीकडे, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशातील महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील शेवटचा बदल 21 मे 2022 रोजी दिसला होता. त्यावेळी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरील कर कमी केला होता. त्यानंतर काही राज्यांनी व्हॅट कमी करून किंवा वाढवून किमतींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती रोज बदलू लागल्यापासून पेट्रोलियम कंपन्यांनी विक्रमी वेळेत कोणतेही बदल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.


प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर


नवी दिल्ली: पेट्रोलचा दर: 96.72 रुपये प्रति लिटर, डिझेलचा दर: 89.62 रुपये प्रति लिटर
कोलकाता: पेट्रोलचा दर: 106.03 , डिझेलचा दर: 92.76 
मुंबई: पेट्रोलचा दर: 106.31, डिझेलचा दर: 94.27 
चेन्नई: पेट्रोलचा दर: 102.63, डिझेलचा दर: 94.24 
बंगळुरु: पेट्रोल दर: ​​101.94, डिझेल दर: ​​87.89 
चंदीगड: पेट्रोलचा दर: 96.20, डिझेलचा दर: 84.26 
गुरुग्राम: पेट्रोल दर: ​​97.18, डिझेल दर: ​​90.05 
लखनौ: पेट्रोलचा दर: 96.57, डिझेलचा दर: 89.76 
नोएडा: पेट्रोल दर: ​​96.79, डिझेल दर: ​​89.96 


महत्वाच्या बातम्या:


पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार का? नेमकी परिस्थिती काय? सविस्तर माहिती एका क्लिकवर