Income Tax Update : मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या नऊ वर्षांमध्ये देशातील प्रत्यक्ष कर संकलनात (Direct Tax Collections)  160 टक्क्यांनी वाढ झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. 2023-14 या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन 6,38,596 कोटी रुपये होते. ते आता  2022-23 या आर्थिक वर्षात 16,63,686 कोटी रुपये झाले आहे. या नऊ वर्षांच्या कालावधीत एकूण प्रत्यक्ष कर संकलनात 173.31 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) आर्थिक वर्ष 2022-23 पर्यंतच्या कर संकलनाची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, 2013-14 मध्ये निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 6,38,596 कोटी रुपये होते, जे आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये पुढील 9 वर्षांमध्ये वाढून 16,63,686 कोटी रुपये झाले आहे. 2013-14 मध्ये एकूण प्रत्यक्ष कर संकलन 7,21,604 कोटी रुपये होते, जे 173.31 टक्क्यांनी वाढून 19,72,248 कोटी रुपये झाले आहे.


CBDT ने म्हटले आहे की 2013-14 मध्ये देशात डायरेक्ट ते डीजीपी गुणोत्तर 5.62 टक्के होते, जे 2022-23 मध्ये 6.11 टक्के झाले आहे. 2013-14 या आर्थिक वर्षात एकूण 3.80 कोटी आयकर रिटर्न भरले होते, ज्यात 104.91 टक्क्यांनी वाढ होऊन ती 7.78 कोटी रुपये झाली आहे.


 






आयकर रिटर्न भरणाऱ्यांची संख्या वाढली (ITR Percentage Increased) 


तसेच 31 डिसेंबर 2023 पर्यंत मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी आयकर रिटर्न भरणाऱ्या लोकांची संख्या 8.18 कोटी झाली आहे, जी मागील मूल्यांकन वर्षात 7.51 कोटी होती. 2023-24 च्या मूल्यांकन वर्षात 9 टक्के अधिक आयकर रिटर्न भरले गेले आहेत. आयकर विभागाने करदात्यांना AIS आणि TIS ची सुविधा सुरू केल्यानंतर करदात्यांची संख्या वाढली आहे.


CBDT नुसार, 2013-14 मध्ये एकूण 5,26,44,496 करदाते होते, ज्यांची संख्या 2022-23 मध्ये 9,37,76,869 पर्यंत वाढली आहे. आकडेवारीनुसार, 2013-14 या आर्थिक वर्षात संकलनाचा खर्च एकूण संकलनाच्या 0.57 टक्के होता, जो 2-22-23 मध्ये 0.51 टक्के झाला आहे.


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर होणाऱ्या या अंतरिम अर्थसंकल्पात करदात्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


ही बातमी वाचा: