Arun Govil:  अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा काल (22 जानेवारी) पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. 'रामायण' या मालिकेत भगवान श्री रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती . राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या काही दिवसांपूर्वी अरुण गोविल हे अयोध्येला पोहोचला होता. पण उद्घाटन सोहळ्यानंतर आता अरुण गोविल यांनी एका गोष्टीबाबत खंत व्यक्त केली आहे.


काय म्हणाले अरुण गोविल?


एका मुलाखतीमध्ये राम मंदिराबद्दल अरुण गोविल यांना विचारण्यात आलं. तेव्हा अरुण गोविल म्हणालेस "स्वप्न तर पूर्ण झालं आहे पण मला दर्शन करायला मिळाले नाही. मी यावेळी याबाबत भाष्य करू शकत नाही."


अरुणने एका वेगळ्या मुलाखतीत राम मंदिराबाबत सांगितलं की, "या दिमाखदार सोहळ्याला उपस्थित राहणे हा एक दैवी अनुभव होता." पुढे ते म्हणाले, मंदिरात प्रचंड गर्दी असल्याने मी दर्शन घेऊ शकलो नाही. शांततेत दर्शन घेण्यासाठी पुन्हा मंदिरात येणार असल्याचे देखील अरुण यांनी सांगितले.



अरुण गोविल यांनी सोशल मीडियावर राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये ते चिरंजीवी आणि राम चरण यांच्यासोबत  दिसत आहेत. हे फोटो शेअर करुन त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात चिरंजीवी आणि त्यांचा मुलगा राम चरण. जय श्री राम'.






अयोध्येत सेलिब्रिटींची मांदियाळी


अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.  अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, रजनीकांत, चिरंजीवी आणि त्यांचा मुलगा राम चरण, माधुरी दीक्षित आणि त्यांचे पती डॉ.श्रीराम नेने, कंगना राणौत, रणबीर कपूर-आलिया भट्ट, रणदीप हुडा आणि पत्नी लिन लैश्राम, विकी कौशल आणि पत्नी कतरिना कैफ हे सोहळ्या पाहण्यासाठी अयोध्येत गेले होते.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Ram Mandir : "ईश्वराला आपण जेव्हा प्रत्यक्ष पाहतो, तेव्हा..."; राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अयोध्येत गेलेल्या मनोज जोशींची प्रतिक्रिया