पुणे : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर (mumbai pune express highway)हायवेवर गुरुवारी (24जानेवारी) ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 2 या वेळा पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद (ब्लॉक) राहणार आहे. द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम बसवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत पुण्याकडे जाणारी सर्व सर्व प्रकारची वाहने (हलकी तसेच जड-अवजड वाहने) यांची वाहतूक बंद राहील, असं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे.
वाहनाधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने शेडुंग फाटा कि.मी 8.200 येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 जुना मुंबई-पुणे महामार्गावरुन शिंग्रोबा घाटातून मॅजिक पॉईंट कि.मी 42.000 येथून पुन्हा द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.
अडचण आल्यास इथे करा संपर्क
गॅन्ट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यावर दुपारी 2 वाजता द्रुतगती मार्गावरील पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान ब्लॉक कालावधीत वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. 9822498224 किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या दूरध्वनी क्रमांक 9833498334 वर संपर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे.
काय आहे ITMS सिस्टिम?
आयटीएमएस म्हणजे इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टिम. या सिस्टिमद्वारे वाहतुकीचं नियंत्रण सॅटेलाईटद्वारे होईल. या प्रणालीमध्ये ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीचा रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाणार आहे. अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहोचेल. संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं असेल. हे कॅमेरे लेन कटिंग करणाऱ्या वाहनांच्या नोंदी ठेवतील. त्याशिवाय अशा वाहनांना अडवण्याचे निर्देश पोलिसांना मिळतील, ज्यामुळे अशा वाहनांना अडवून संभाव्य अपघात टाळता येतील. 39 ठिकाणी तब्बल 370 विविध कॅमेरे तैनात असतील. या प्रकल्पासाठी 340 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातील 115 कोटी उभारणी साठी तर उर्वरित 225 कोटी हे पुढील दहा वर्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जाणारे आहेत.
इतर महत्वाची बातमी-