एक्स्प्लोर

जगातील सर्वात मोठ्या गोदाम योजनेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, शेतकऱ्यांसाठी देशाच्या कानाकोपऱ्यात उभारणार गोदाम

जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणुकीच्या पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज केलं.

Warehouse News : सहकार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणुकीच्या पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज केलं. शेतकऱ्यांसाठी ही जगातील सर्वात मोठी साठवणूक योजना आहे. यामुळं देशाच्या कानाकोपऱ्यात गोदामे बांधली जाणार आहेत.  शेतीचा पाया मजबूत करण्यात सहकाराची मोठी भूमिका आहे. हे लक्षात घेऊन आम्ही स्वतंत्र सहकार मंत्रालय तयार केले आहे. शेतकऱ्यांसाठी ही जगातील सर्वात मोठी साठवण योजना सुरू करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

11 राज्यांतील 11 गोदामांचे उद्घाटन

आज भारत 'विकसित भारत'च्या अमृत प्रवासातील आणखी एक मोठी उपलब्धी पाहत आहे. सहकाराच्या माध्यमातून देशाने समृद्धीसाठी घेतलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्याच्या दिशेने आज आपण वाटचाल करत आहोत. शेतीचा पाया भक्कम करण्यात सहकाराचा मोठा वाटा असल्याचे मोदी म्हणाले. देशात हजारो गोदामे तयार केली जाणार आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात ही गोदामे बांधण्यात येणार आहेत. 11 राज्यांतील 11 प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) मध्ये ते कार्यरत आहे. यादरम्यान पीएम मोदींनी सहकार क्षेत्रातील इतर अनेक योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत, 11 राज्यांतील 11 गोदामांचे उद्घाटन करण्यात आले असून 500 पॅकमधील गोदामांची पायाभरणी करण्यात आली आहे.

स्वतंत्रपणे सहकार मंत्रालय 

शेतीचा पाया मजबूत करण्यात सहकाराची शक्ती मोठी भूमिका बजावते. हे लक्षात घेऊन आम्ही स्वतंत्र सहकार मंत्रालय तयार केले आहे. आज आम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी जगातील सर्वात मोठी साठवण योजना सुरू केली आहे. सहकार ही केवळ एक व्यवस्था नाही, सहकार ही भावना असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सहकार्यामुळे उपजीविकेची साधी व्यवस्था मोठ्या औद्योगिक क्षमतेत बदलू शकते. देशाच्या अर्थव्यवस्थेला, विशेषतः ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्याचा हा एक सिद्ध मार्ग आहे. आज देशातही दुग्धव्यवसाय आणि कृषी क्षेत्रातील शेतकरी सहकारी संस्थांशी निगडीत आहेत आणि त्यात करोडो महिलांचाही समावेश आहे. महिलांची ही क्षमता पाहून सरकारनेही त्यांना सहकाराशी संबंधित धोरणांमध्ये प्राधान्य दिले आहे.

कृषी प्रणालीचे आधुनिकीकरण आवश्यक 

विकसित भारतासाठी भारताच्या कृषी प्रणालीचे आधुनिकीकरण महत्त्वाचे आहे. कृषी क्षेत्रात नवीन व्यवस्था करण्याबरोबरच आम्ही PACS सारख्या सहकारी संस्थांनाही नवीन भूमिकांसाठी तयार करत आहोत. देशात 10,000 शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) स्थापन करण्याचे आमचे लक्ष्य होते. मला सांगायला आनंद होत आहे की आज 8,000 FPO आधीच स्थापित केल्या आहेत. आज आपल्या एफपीओच्या यशोगाथा देशाच्या सीमेपलीकडेही चर्चिल्या जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 

सहकार क्षेत्रात बदल आवश्यक : अमित शाह

जेव्हापासून देश स्वतंत्र झाला तेव्हापासून देशभरातील सहकारी क्षेत्रातील कामगार विविध पक्षांच्या सरकारकडे सहकार्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी करत होते. कारण सहकार क्षेत्रात काळानुरूप बदल होणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले. आता त्यामध्ये आधुनिकीकरण करावे लागेल आणि त्यात पारदर्शकताही आणावी लागेल असे शाह म्हणाले. मोदीजी पंतप्रधान झाल्यावर 70 वर्षे जुनी मागणी पूर्ण झाली आणि सहकार मंत्रालयाची स्थापना झाल्याचे मोदी म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

Dabur Products Ban : 'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !
प्रत्येक महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात आर्थिक साक्षरता अनिवार्य का असावी?
प्रत्येक महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात आर्थिक साक्षरता अनिवार्य का असावी?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget