Sensex News : आशियाई शेअर बाजारातील वाढीमुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजार तेजीसह उघडला. बाजार उघडताच सुरुवातीला हिरव्या फितीत असलेला बाजार पुन्हा अस्थिर स्थितीमुळे लाल फितीत आल्याचं दिसत आहे. सेन्सेक्स 13 अंकांनी खाली तर निफ्टी देखील 5 अंकांनी घसरल्याचे चित्र दिसत आहे.
सकाळी हिरव्या फितीत असलेला बाजार पुन्हा अस्थिर स्थितीमुळे लाल फितीत
आज सकाळी 9.30 दरम्यान मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 177 अंकांच्या वाढीसह 56,603 वर उघडला, तर निफ्टी 29 अंकांच्या वाढीसह 16,900 वर व्यापार उघडला. दरम्यान, सकाळी बाजार उघडताच सुरुवातीला हिरव्या फितीत असलेला बाजार पुन्हा अस्थिर स्थितीमुळे लाल फितीत आला. कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. क्रूड ऑइल 102 डॉलर प्रति बॅरलवर आहे. तर डॉलरच्या तुलनेत रुपया 76.33 वर आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे रुपयावर दबाव कायम राहिला. आयटी, मेटल, आणि ऑइल ॲंड गॅस क्षेत्रातील शेअर्स घसरले तर रिॲलिटी आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, रिअल इस्टेट इत्यादी क्षेत्रांमध्ये शेअर बाजारात मोठी वाढ होत आहे. स्मॉल कॅप, मिड कॅप समभागांमध्ये मोठी खरेदी दिसून येत आहे. केवळ धातू, ऊर्जा, कमोडिटी या क्षेत्रांतच विक्री होत आहे. सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी 24 समभाग हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत. तर 6 लाल चिन्हात व्यवहार करत आहेत. दुसरीकडे, निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 37 शेअर्स हिरव्या चिन्हात तर 13 शेअर्स लाल चिन्हात व्यवहार करत आहेत. बाजारातील वाढत्या समभागांवर नजर टाकली, तर अॅक्सिस बँक 0.98 टक्के, एसबीआय 0.74 टक्के, मारुती 1.39 टक्के, एशियन पेंट्स 2.11 टक्के, आयसीआयसीआय 0.96 टक्के, बजाज फायनान्स 0.14 टक्के, लार्सन 0.99 टक्के, डॉ. रेड्डी, आय. 237 टक्के. टक्के, सन फार्मा 0.36 टक्के, विप्रो 0.26 टक्के वाढीसह व्यवहार करत आहेत.
रशिया-युक्रेन युद्धाचे सावट हटले?
काल शेअर मार्केटची परिस्थिती पाहता, रशिया-युक्रेन युद्धाचे सावट भारतीय शेअर बाजारावरून हटल्याचं दिसून आलं. सलग पाचव्या सत्रामध्ये शेअर बाजार वधारला असून आज आज बाजार बंद होताना सेन्सेक्स 935 अंकांनी वधारला तर निफ्टीही 240 अंकानी वधारला होता. सेन्सेक्समध्ये 1.68 टक्क्यांची वाढ होऊन तो 56,486.02 वर पोहोचला होता तर निफ्टीमध्ये 1.45 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,871.30 वर पोहोचला होता.
संबंधित बातम्या