PayTM : पेटीएमच्या शेअर दरात सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली.  सोमवारी शेअर बाजार सुरू झाल्यानंतर पेटीएमच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. पेटीएमचा शेअर 12 टक्क्यांनी घसरून 672 रुपयांपर्यंत त्याचा दर पोहचला होता. पेटीएम शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर आतापर्यंतचा हा नीचांक दर आहे. त्याशिवाय, पेटीएमचे बाजार भांडवल 50 हजार कोटींहून कमी झाला आहे. पेटीएमच्या पडझडीत गुंतवणूकदार होरपळले आहेत. 


आरबीआयच्या कारवाई फटका?


शुक्रवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेवर निर्बंध लागू केले. पेटीएम पेमेंट्स बँकेत नवीन ग्राहकांचा समावेश करण्यास रिझर्व्ह बँकेने मनाई केली. त्याच्या परिणामी सोमवारी पेटीएमचा शेअर कोसळला असल्याचे म्हटले जात आहे. पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने आयटी लेखा परीक्षण केल्यानंतर आरबीआयच्या परवानगीनंतर नवीन ग्राहकांचा समावेश करावा असे आदेश आरबीआयने दिले आहेत. 


पेटीएम पेमेंट्स बँकेच्या परीक्षणादरम्यान आरबीआयला काही चिंताजनक बाबी आढळल्या. त्यानंतर पेटीएम बँकेवर निर्बंध लागू करण्यात आले. 


पेटीएमचा शेअर किती घसरणार?


शेअर बाजारात लिस्टींग झाल्यानंतर पेटीएमच्या शेअरमध्ये सातत्याने विक्री सुरू आहे. शेअर बाजारात लिस्टींग झाल्यानंतर आतापर्यंत जवळपास 68 टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली. पेटीएमचा शेअर 2150 रुपयांना लिस्ट झाला होता. 


मार्केट कॅपिटलमध्ये मोठी घट


पेटीएमने आयपीओ आणला तेव्हा कंपनीचे मार्केट कॅपिटल 1,39,000 कोटी रुपये होते. त्यात आता घट झाली असून 45800 कोटी इतकी झाले आहे. पेटीएमचे बाजार भांडवल जवळपास 94 हजार कोटी रुपयांनी घटले आहे. पेटीएमचा आयपीओ हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



पाहा: Paytm IPO : पेटीएमला श्रीमंत करणाऱ्या Vijay Shekhar Sharma यांच्या यशाची कहाणी