मुंबई : लवकरच आयडीएफसी लिमिटेडचे (IDFC Ltd) आयडीएफसी फर्स्ट बँकेत (IDFC First Bank) विलीनीकरण होण्याची शक्यता आहे. आयडीएफसी फस्ट बँकेच्या समभागधारकांनी याला मंजुरी दिली आहे. या मंजुरीबाबतची माहिती शेअर बाजाराला देण्यात आली आहे. चेन्नईत नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या ब्रांचमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीत या विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. 


विलीनीकरणाचा नेमका प्रस्ताव काय?


आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या समभागधारकांनी तसेच एनसीडी धारकांनी मूळ कंपनी आयडीएफसी लिमिटेडचे आयडीएफसी बँक लिमिटेडमध्ये विलीनकरण करण्यास मंजुरी दिली आहे. याबाबत आयडीएफसी फस्ट बँकेने शेअर बाजाराला सविस्तर माहिती दिली आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी) ने या विलीनीकरणावर विचार करण्यासाठी तसेच मंजुरी देण्यासाठी 17 मे रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक बैठक बोलावली होती. या बैठखीत बँकेच्या बोर्डाने विलीनीकरणाच्या प्रस्तावाचे आकडे सांगितले. साधारण 99.95 मते ही विलीनीकरणाच्या पक्षात आहेत, असे आयडीएफसी फस्ट बँकेने एनसीएलटीला सांगितले आहे. 


आरबीआयकडून मिळाली एनओसी 


सूत्रांच्या माहितीनुसार एनसीएलटी देखील लवकरच या विलीनीकरणाला मंजुरी देण्याची शक्यता आहे. कारण याआधी आयडीएफसी लिमिटेड, आयडीएफसी एफएचसीएल आणि आयडीएफसी यांच्या विलीनीकरणाला आरबीआयने मंजुरी दिली आहे, असे आयडीएफसीने 27 डिसेंबर रोजी सांगितले होते. याआधी जुलै 2023 मध्ये आयडीएफसी एफएचसीएल, आयडीएफसी और आयडीएफसी फर्स्ट बैँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने या विलीनीकरणाला हिरवा झेंडा दाखवला होता. 


दहा वर्षांपूर्वी मिळाला होता परवाना 


दरम्यान, आयडीएफसी बँकेला दहा वर्षांआधी म्हणजेच 2014 साली रिझर्व्ह बँकेकडून परवाना मिळाला होता. या मंजुरीच्या चार वर्षांनंतर आयडीएफसी बँक लिमिटेड आणि कॅपिटल फर्स्ट लिमिटेडने आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या निर्मितीसाठी विलीनीकरणाची घोषणा केली होती. आयडीएफसीची आयडीएफसी फर्स्ट बँकेत 39.93 टक्के हिस्सेदारी आहे. 


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


नावाला पेनी स्टॉक, पण ठरतोय शेअर बाजारातील किंग, 'या' कंपनीच्या शेअरने दिले 3400 टक्के रिटर्न्स!


एका वर्षांत मिळाले 420 टक्के रिटर्न्स, 'या' कंपनीचे शेअर्स तुम्हालाही करू शकतात मालामाल!


2 लाखांचा विमा, 5 हजार पेन्शन; प्रिमियम 100 रुपयांच्या आत; पोस्ट ऑफिसच्या 'या' तीन योजनांत गुंतवणूक कराच!