एका वर्षांत मिळाले 420 टक्के रिटर्न्स, 'या' कंपनीचे शेअर्स तुम्हालाही करू शकतात मालामाल!

एसबीआय सेक्यूरिटीजने बीएसई लिमिटेडचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीचे शेअर्स एका वर्षासाठी खरेदी करावेत, असे एसबीआयने सांगितले आहे.

bse_ltd_stock_market_update (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क, freepik)

1/5
BSE Stock to Buy: लिस्टेड कंपन्यांच्या संख्येच्या बाबतीत बीएसई लिमिटेड जगातील सर्वांत जुन्या स्टॉक एक्सचेंजपैकी एक आहे. प्रोसेस्ड ऑर्डर्सच्या बाबतीत बीएसई जगातील चौथा सर्वांत मोठा डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज आहे.
2/5
ब्रोकरेज फर्म एसबीआय सिक्योरिटीजने बीएसई लिमिटेडमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. बीएसई लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना एक वर्षांत 420 टक्के रिटर्न्स दिले आहेत.
3/5
SBI सिक्योरिटीजने BSE Ltd चा शेअर खरेदी करण्याचा सल्ला देताना या शेअरमध्ये 12 महिन्यांसाठी गुंतवणूक करण्यास सांगितले आहे. त्यासाठी टार्गेट प्राईज 3,231.4 रुपये प्रतिशेअर ठेवावी. तसे केल्या बीएसई लिमिटेड कंपनीच्या शेअरच्या सध्याच्या मूल्यानुसार 12 महिन्यांत गुंतवणूकदारांना 15 टक्क्यांनी रिटर्न्स मिळू शकतात.
4/5
BSE च्या शेअरने आपल्या गुंतवणूकादारांना एका वर्षांत साधारण 420 टक्के मल्टिबॅगर रिटर्न्स दिले आहेत. 3 वर्षांत बीएसईने गुंतवणूकदारांना 1000 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न्स दिले आहेत.
5/5
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Sponsored Links by Taboola