Benefits Of Kala Tika : अनेकदा आपल्या लेकराला वाईट नजरेपासून वाचवण्साठी  आई  मुलांना  काळा टिका (Kala Tika) लावतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  देखील आज राज्यसभेत बोलताना देशाला प्रगतीला नजर लागू नये यासाठी काँग्रेसने काळा टिका लावल्याचा टोला लगावला. त्यानंतर काळा टिका खरच वाईट नजरेपासून संरक्षण देतो का या चर्चां सुरू झाल्या आहे.  पण खरच काळा टिका हा वाईट शक्तींपासून संरक्षण करतो का? काय आहे त्यामागील धार्मिक (Kala Tika Astro Tips) आणि वैज्ञानिक  कारण जाणून घेऊया. 


लहान मुलांच्या कपाळावर टीका लावल्याने त्यांची एकाग्रता वाढतो. काळा रंग हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. जेव्हा आई काळजीने बाळाला टिका लावते तेव्हा  प्रेम, काळजी  एक सकारात्मक कवच म्हणून ती आपल्या बाळाला लावत असते.  जेव्हा कुणीतरी बाळाकडे वाईट नजरेने बाळाकडे पाहते तेव्हा हा टिका संरक्षण कवच म्हणून काम करतो असे म्हटले जाते.  वाईट नजरेवर काळा रंग प्रभावी ठरतो.  


मुलांना काळा टिका लावण्याचे  शास्त्रीय कारण?


वैज्ञानिक तथ्यांनुसार, मानवी शरीरात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहेत. परंतु मुलांमध्ये या रेडिएशनची कमतरता असते, त्यामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीची वाईट नजर मुलावर पडते तेव्हा मुलांमध्ये असलेल्या या रेडिएशनचा वाईट परिणाम होतो. याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर (Health) होऊ शकतो.


मुलांना काळा टिका लावण्याचे धार्मिक कारण?


धार्मिक शास्त्रानुसार काळा रंग नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करण्याचे काम करतो. जर एखादी व्यक्ती वाईट नजरेने  पाहत असेल तर या  नकारात्मक ऊर्जेमुळे बाळाला अनेक आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यात आहे. हे फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्या व्यक्ती देखील पायात काळा धागा बांधतात. काळ रंग वापरल्याने  तेव्हा ही नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि शरीरावर त्याचा फारसा प्रभाव दिसत नाही.


नजर न लागण्यासाठी अनेक उपाय


ज्योतिष शास्त्रातही नजर न लागण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. लहान मुलांना काळा टिका लावतात त्याप्रमाणे  मोठ्या मुलांना काळा धागा बांधला जातो. पायात काळा धागा बांधल्याने नजर लागत नाही.  काळा धागा पायात काळा धागा बांधल्याने ती  व्यक्ती नकारात्मक शक्तींच्या प्रभावापासूनही दूर राहते. 


पायावर काळा धागा बांधण्याचे नियम 


पायावर काळा धागा बांधण्याचे काही नियम आहेत. त्यानुसार पुरुषांनी उजव्या पायावर काळा धागा बांधावा. तर महिलांनी डाव्या पायावर काळा धागा बांधला पाहिजे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हे ही वाचा :