मुंबई : सध्या नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झालेल्या अमर सिंह चमकीला (Amar Singh Chamkila) या चित्रपटाची सगळीकडे चर्चा चालू आहे. या चित्रपटात पंजाबी गायक चमकीला याचा जीवनप्रवास मांडण्यात आला आहे. मोबाईल फोन नसलेल्या त्या काळात गायक चमकीला हा पंजाबच्या (Punjab) खेड्या-खेड्यांत पोहोचला होता. लोकांच्या कार्यक्रमात गाणारा हा चमकीला पंजाबमध्ये कमी काळात प्रसिद्ध झाला होता. एलपी रेकॉर्ड्स कंपनीमुळे हा चमकीला संपूर्ण पंजाबला माहिती झाला होता. पण चमकीलाला प्रसिद्धी देणारी ही एलपी रेकॉर्ड्स कंपनी सध्या काय करत आहे? हे जाणून घेऊ या.


पूर्वी मोबाईल्स नव्हते. त्यामुळे लोक संगित एकण्यासाठी  ग्रामोफोनचा वापर करायचेच. गायकांची गितं एलपी रेकॉर्ड्सवर रेकॉर्ड केली जायची. त्या रेकॉर्डिंगची एक सीडी यायची. या ही सीडी ग्रामोफोनवर ठेवून गाणे ऐकले जायचे. अमर सिंह चमकीलाला याच एलपी रेकॉर्ड्समुळे प्रसिद्धी, नाव मिळालं. विशेष म्हणजे चमकीला सुपरस्टार झाल्यामुळे त्याच्या गाण्यांची रेकॉर्डिंग करणाऱ्या या कंपनीनेही त्या काळात खूप पैसे कमवले.  


एचएमव्ही ते सारेगामा  


सारेगामा इंडिया लिमिटेड ही भारतातील सर्वांत जुनी म्यूझिक लेबल कंपनी आहे. ही कंपनी आरपी संजीव गोयंका ग्रुपच्या मालकीची आहे. याआधी मात्र या कंपनीचे नाव सारेगामा नव्हते. या कंपनीला 1901 मध्ये ग्रामोफोन अँड टाईपरायटर लिमिटेड या नावाने ओळखले जायचे. या कंपनीचे मुख्यालय कोलकात्यात होते. आजही या कंपनीचे मुख्यालय कोलकात्यातच आहे.  गोल्डन इरामधील सर्वाधिक प्रसिद्ध गाण्यांवर याच कंपनीचा मालकीहक्क आहे.


देशातील पहिला स्टुडिओ याच कंपनीने तयार केला


ग्रामफोन अँड टाईपरायटर लिमिटेड या कंपनीचे नाव कालांतराने ग्रामोफोन कंपनी ऑफ इंडिया असे करण्यात आले होते. या कंपनीच्या रेकॉर्डिंग स्टुडिओत रविंद्रनाथ टागोर यांनी स्वत:च्या आवाजात काही गितं रेकॉर्ड केले होती. देशातील पहिला रेकॉर्डिंग स्टुडिओदेखील 1928 साली याच कंपनीने तयार केला होता. या रेकॉर्डिंग स्टुडिओचे नाव दम दम स्टुडीओ असे ठेवण्यात आले होते.


2000 साली कंपनीचे नाव बदलले


सुरुवातीला या कंपनीने 100 वर्षांपर्यंत ‘एचएमव्ही’ याच नावाने काम केले. 2000 साली या कंपनीचे नाव बदलून ‘सारेगामा’ असे करण्यात आले. याच कंपनीने 1980 च्या दशकात अमर सिंह चमकीलाचे गाणे रेकॉर्ड केले. ही गाणी पंजाबमध्य कमी काळात प्रसिद्ध झाली. 


कंपनी आज काय काम करते? 


पूर्वीची एचएमव्ही ही कंपनी आज सारेगामा या नावाने ओळखली जाते. या कंपनीकडे अनेक गाण्याचे कॉपीराईट्स आहेत. कॉपीराईट्सच्या माध्यमातून ही कंपनी चांगला पैसा कमवते. ही कंपनी चित्रपटनिर्मिती, चित्रपटाचे वितरण अशी कामे करते. तसेच कारवां या प्री-रेकॉर्डिंग डिव्हाईसच्या माध्यमातूनही ही कंपनी पैसे कमवते. ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध आहे. सध्या या कंपनीचे उत्पन्न हे  204 कोटी रुपये असून निव्वळ नफा 52.22 कोटी रुपये आहे. 


हेही वाचा :


पगार तब्बल 24 कोटी! कोण आहेत निखील मेसवानी जे मुकेश अंबानींचे आहेत खास!


गुंतवणुकीतून चांगला परतावा हवाय? मग 'हे' आहेत सर्वोत्तम पाच पर्याय!


SIP फक्त श्रीमंतांसाठीच असते? पैसे बुडण्याचा धोका असतो का? जाणून घ्या 'या' पाच प्रश्नांची सोपी उत्तरं!