IPL 2024 Shashank Singh: पंजाब किंग्सकडून खेळणारा शशांक सिंहने स्टार (Shashank Singh) नाही तर सुपरस्टार बनला आहे. शशांक पंजाब किंग्सकडून कडून सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. शशांकला आयपीएल 2024 च्या मिनी लिलावात पंजाबने 20 लाख रुपयांना विकत घेतले होते. शशांकच्या खेळीचं सर्वजण कौतुक करत आहेत. याचदरम्यान शशांकने दिलेल्या एका मुलाखतीची सध्या चर्चा रंगली आहे.
शशांक सिंहचे वडील आहेत आयपीएस अधिकारी-
शशांक सिंहचे वडील आयपीएस अधिकारी आहेत. शशांकला क्रिकेटर बनवण्याचे स्वप्न त्याच्या वडिलांनीच पाहिले होते. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की IPS होऊनही वडिलांनी आपल्या मुलाला शशांकला क्रिकेटर बनवण्याचे स्वप्न का पाहिले? शशांकने स्वतःच खुलासा केला होता की, त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्याने क्रिकेट खेळावे. 'दैनिक भास्कर'ला दिलेल्या मुलाखतीत शशांक म्हणाला होता की, 'वडीलांचं स्वप्न होतं की मी क्रिकेटर व्हावं. लहानपणी वडील स्वतः गोलंदाजी करत माझा सराव घ्यायचे. त्यांनी मला घरी टर्फ पिच बनवून क्रिकेट खेळायला शिकवले, असं शशांकने सांगितले.
9 सामन्यात 263 धावा
शशांकने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 65.7 च्या सरासरीने आणि 182.6 च्या स्टाइक रेटने 263 धावा केल्या. शशांकने दोन अर्धशतक झळकावले आहेत. शशांकने आतापर्यंत 19 षटकार आणि 18 षटकार टोलावले आहेत. महत्वाचं म्हणजे शशांकने छोट्या-छोट्या पण स्फोटक खेळी करुन सर्वांना प्रभावित केले आहे.
कोण आहे शशांक सिंह?-
शशांक सिंह हा मूळचा छत्तीसगडचा खेळाडू आहे. आक्रमक फलंदाजीसाठी त्याची ओळख आहे. शशांक सिंह गोलंदाजी देखील करु शकतो. आयपीएलच्या मिनी ऑक्शनच्या वेळी शशांक सिंहला संधी देण्यात कुठल्याही फ्रँचायजीनं पुढाकार घेतला नव्हता. पंजाब किंग्सनं शशांक सिंहला संघात घेतलं होतं मात्र काही कारणांमुळं त्यांना आपण चुकीच्या खेळाडूला संघात घेतल्याचं वाटलं होतं. काही काळानंतर गैरसमज दूर झाले आणि पंजाबनं शशांक सिंहला संघात घेतल्याचं जाहीर केलं होतं.
मला यापूर्वी संधी मिळाली नाही-
04 एप्रिल रोजी झालेल्या पंजाब आणि गुजरात विरुद्धच्या सामन्यात देखील शशांकने स्फोटक खेळी केली होती. यानंतर त्याने केलेल्या विधानाची खूप चर्चा झाली. मला यापूर्वी अनेक सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. शशांक सिंगने स्पष्टपणे सांगितले की, खेळाडू तेव्हाच कामगिरी करू शकतो जेव्हा त्याच्यावर विश्वास दाखवला जातो आणि त्याला संधी दिली जाते, असं शशांक म्हणाला होता. सनरायझर्स हैदराबादने त्याला 2022 मध्ये खेळण्यासाठी जास्त संधी दिली नव्हती.
संबंधित बातम्या:
दोघांनी धावून एक रन पूर्ण केला, अंपायरने मात्र तो फेटाळला; गौतम गंभीर मैदानाबाहेर भिडला, Video