(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फक्त 1 रुपयांपासून 'या' कंपनीने कमावला करोडोंचा नफा, जाणून घ्या सविस्तर माहिती
झोमॅटो (zomato) ही कंपनी फूड डिलिव्हरीवर (Food delivery) मोठ्या प्रमणात सवलत देते. कधी 50 टक्के सूट तर कधी 80 टक्के सूट असते. तरीदेखील कंपनी नफ्यात आहे.
Business News : झोमॅटो (zomato) ही कंपनी फूड डिलिव्हरीवर (Food delivery) मोठ्या प्रमणात सवलत देते. कधी 50 टक्के सूट तर कधी 80 टक्के सूट असते. तरीदेखील कंपनी नफ्यात आहे. दरम्यान, तुम्हाला देखील तुम्हालाही स्टार्टअप सुरू करायचा असेल, तर तुम्ही झोमॅटोचे बिझनेस मॉडेल समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नुकतेच झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल यांनी हे गुपित उघड केले आहे. झोमॅटोने फक्त 1 रुपयांपासून करोडोंचा नफा कसा कमावला याबाबतची माहिती पाहुयात.
Zomato शेअर बाजारात सूचीबद्ध आहे. कंपनीचे शेअर्स बराच काळ खाली राहिले, पण कंपनीला नफा मिळू लागताच त्याचे शेअर्स पुन्हा एकदा वर येऊ लागले. कंपनीने फक्त 1 रुपये वाचवून नफा मिळवण्यास सुरुवात केली आहे होती.आज करोडोंचं साम्राज्य उभं केलं आहे.
फक्त 1 रुपयामधून कोटींचा नफा
दीपंदर गोयल यांनी अलीकडेच सोशल मीडियावरील पॉडकास्टमध्ये झोमॅटोच्या कमाईच्या मॉडेलची माहिती दिली. रेस्टॉरंट्सकडून कमिशन, ग्राहकांकडून प्लॅटफॉर्म शुल्क आणि डिलिव्हरी शुल्क आकारून झोमॅटोचा महसूल मिळत असल्याचे त्यांनी सांगितले होते. तर Zomato ला डिलिव्हरी बॉय, रिफंड, प्लॅटफॉर्म रनिंग कॉस्ट यावर पैसे खर्च करावे लागतात. अशाप्रकारे, झोमॅटोमधून बाहेर जाणाऱ्या पैशापेक्षा येणारा पैसा अधिक असावा, असे एकूण गणित आहे.
झोमॅटोची सरासरी ऑर्डर 300 ते 400 रुपये आहे हे त्यांनी सोप्या भाषेत स्पष्ट केले. यावर, त्याला कमिशन म्हणून 80 रुपये मिळतात, ग्राहक शुल्क आणि डिलिव्हरी चार्जेससह, त्याला सुमारे 20 ते 30 रुपये म्हणजे 100 रुपये एकूण महसूल मिळतो. आता 60 ते 70 रुपये फक्त डिलिव्हरी बॉयवरच खर्च होतात. त्याच वेळी, परतावा, कस्टमर केअर, टेक टीम, ऑफिस, आणि पगार इत्यादीसारख्या निश्चित खर्चांवर देखील पैसे खर्च केले जातात. एवढा खर्च करुनही कंपनीला मोठा नफा होतो
Zomato ने करोडोंची कमाई केली
झोमॅटोच्या आर्थिक विवरणांवर नजर टाकल्यास, चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा नफा 36 कोटी रुपये आहे. तर 2022-23 च्या याच तिमाहीत कंपनीने 251 कोटी रुपयांचा तोटा दाखवला होता. या कालावधीत त्यांचा महसूल 2,848 कोटी रुपये आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत 1,661 कोटी रुपये होता. दरम्यान, कंपनीला नफा मिळू लागताच त्याचे शेअर्स पुन्हा एकदा वर येऊ लागले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
Swiggy Update: सलग आठव्या वर्षी खवय्यांची बिर्याणीला सर्वाधिक पसंती! गुलाबजामने रसगुल्ल्याला टाकलं मागे