एक्स्प्लोर

Aadhaar Card Limit Exhausted : आधारकार्ड दुरुस्त लिमिट संपली? चिंता करू नका, ही ट्रिक्स वापरा!

अनेक जणांच्या आधारकार्डची दुरुस्ती लिमिट संपली आहे. त्यामुळे त्यांना नवीन दुरुस्ती करताना अडचणी येत आहे.. आधारकार्डची लिमिट संपल्यावरही दुरुस्ती करण्यात येते. त्यासाठी काही प्रोसेस असते..

तुमच्या आधारकार्डाची दुरुस्त लिमिट संपली आहे का? किंवा आधार सेंटरवर जाऊनही तुमचे आधारकार्ड अपडेट होत नाही का? तर काळजी करू नका..लिमिट संपल्यानंतरही आधारकार्ड अपडेट कसं करायचं? हे आपण जाणून घेणार आहोत.... सर्वात आधी तुमच्या जवळच्या अधिकृत आधार नोंदणी केंद्रात जा. तिथे त्यांना सांगा की तुमची लिमिट संपली आहे, तरीही तुम्हाला अपडेट करायचे आहे.

हे कागदपत्रं गरजेचे?

-तुमचे आधार कार्ड

-योग्य नाव किंवा जन्मतारखेचा पुरावा 

-स्व-घोषणा पत्र हे फॉर्म तुम्हाला आधार केंद्रावरच मिळेल.

-हा फॉर्म भरून दिल्यानंतर केंद्र संचालक तुमचे बायोमेट्रिक्स घेतील आणि तुम्हाला एक 'अपडेट पावती' देतील. ही पावती सांभाळून ठेवा!


आता यानंतर तुम्हाला महत्वाची प्रोसेस करायची आहे

-तुम्हाला UIDAI ला ईमेल पाठवायचं आहे.

१. तुमचे आधार कार्ड
२. अचूक पुराव्याचे कागदपत्र (Birth Certificate)
३. भरलेले स्व-घोषणा पत्र
४. नवीन मिळालेली आधार अपडेट पावती

या सर्व कागदपत्राची एक PDF फाईल तयार करायची आहे

ही PDF फाईल UIDAI च्या अधिकृत ईमेल आयडी help@uidai.gov.in वर पाठवा. 

ईमेलमध्ये तुमचा नोंदणी क्रमांक (Enrollment ID) टाका आणि लिमिट ओलांडल्यामुळे विशेष मंजुरी देऊन अपडेट करण्याची विनंती करा.

एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा: ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तुमच्या आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे. जर नसेल, तर आधी आधार केंद्रावर जाऊन मोबाईल नंबर अपडेट करून घ्या.

ईमेल पाठवल्यानंतर UIDAI कडून तुमच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल आणि काही दिवसांत तुमचे आधार कार्ड अपडेट होईल!

About the author सलमान शेख

सलमान शेख, हे 'एबीपी माझा' डिजीटलमध्ये व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून काम करतात. ते विविध विषयांवर व्हिडिओची निर्मिती करतात. त्यात 'कामाची गोष्ट With ABP माझा' ही सिरीझ लोकप्रिय आहे. यात ते दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या गोष्टी सोप्या भाषेत मांडतात. पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांना 4 वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव आहे. याआधी त्यांनी टाईम्स नाऊ मराठी, दिव्य मराठीमध्ये काम केले आहे. राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आवड असून 'खोटं प्रॉमिस' या कादंबरीचे लेखक आहेत. 'उघड्यावरची भाकर' ही त्यांची कांदबरी लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
E100 Flex Fuel Vehicles : E100 इंधनाला मंजुरी, वाहनावर काय परिणाम?
E100 Flex Fuel Vehicles : E100 इंधनाला मंजुरी, वाहनावर काय परिणाम?
Share Market : शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, नव्या आठवड्यात दमदार सुरुवात, गुंतवणूकदारांवर दिवाळीपूर्वी पैशांचा पाऊस, 3 लाख कोटी कमावले...
शेअर बाजारात नव्या आठवड्यात दमदार सुरुवात, गुंतवणूकदारांवर दिवाळीपूर्वी पैशांचा पाऊस, 3 लाख कोटी कमावले...
दुबईतील 1 कोटीची नोकरी सोडली, भारतात सुरु केलं स्टार्टअप, आता वर्षाला मिळवतेय 2 कोटी 20 लाख, वाचा जिद्दी तरुणीची यशोगाथा
दुबईतील 1 कोटीची नोकरी सोडली, भारतात सुरु केलं स्टार्टअप, आता वर्षाला मिळवतेय 2 कोटी 20 लाख, वाचा जिद्दी तरुणीची यशोगाथा
Advertisement

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
Embed widget