मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) नेतृत्त्व रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) करतोय. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सनं आयपीएल अगोदर ट्रेड करुन संघात घेतलं होतं. रोहित शर्माऐवजी मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व हार्दिक पांड्याला दिल्यानं चाहत्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं.हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्स विरुद्धच्या पहिल्या मॅचपासून चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. अहमदाबाद, हैदराबाद, मुंबईसह विविध ठिकाणी झालेल्या मॅचमध्ये हार्दिक पांड्याला चाहत्यांच्या शेरेबाजीला सामोरं जावं लागलं होतं. हार्दिक पांड्या फॅन्सच्या शेरेबाजीमुळं मानसिक तणावात असल्याचा दावा टीम इंडियाचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पानं केला आहे.


टीम इंडियाचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पानं हार्दिक पांड्याबाबत मोठा दावा केला आहे. हार्दिक पांड्या मानसिक तणावाचा सामना करत आहे. हार्दिक सोबत जे घडत आहे त्यामुळं त्याच्या मनाला ठेच पोहोचत असेल, असा दावा रॉबिन उथप्पानं केला आहे. तो ' द रणवीर शो' मध्ये तो बोलत होता. 


हार्दिकमध्ये मोठी क्षमता : रॉबिन उथप्पा 


हार्दिक पांड्यामध्ये भारतीय क्रिकेटचा महान खेळाडू बनण्याची क्षमता आहे. मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्याला संघातून जाऊ दिलं. मुंबईनं त्याला पहिल्यांदा संधी दिली होती, तीन ते चार वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाचा तो सदस्य होता. मात्र, मुंबईनं त्याला संघातून बाहेर जाऊन दिलं.यामुळं देखील त्याला वाईट वाटलं असेल. यानंतर हार्दिक पांड्या गुजरातमध्ये गेला, तिथं त्यानं एक ट्रॉफी जिंकली आणि पुढच्या हंगामात उपविजेतेपद मिळवलं. यानंतर पुन्हा त्याला मुंबईच्या संघात आणलं गेलं, असं रॉबिन उथप्पानं म्हटलं.  
     
रॉबिन उथप्पानं म्हटलं की शेरेबाजी, ट्रोलिंग आणि त्याच्या फिटनेसबद्दल शेअर होणाऱ्या मीम्समुळं त्याला त्रास होत असेल असं तुम्हाला वाटत नाही का? अशा गोष्टींमुळं कोणत्याही व्यक्तीला त्रास होत असेल. किती लोकांना वस्तुस्थिती माहिती आहे, या गोष्टींमुळं हार्दिक पांड्या मानसिक समस्यांचा सामना करतोय. भारतीय या नात्यानं आपण भावनिक आहोत. मात्र, एखाद्या व्यक्तीसोबत अशी वर्तणूक योग्य नाही. असं रॉबिन उथप्पानं म्हटलं. 


दरम्यान, रॉबिन उथप्पानं महेंद्रसिंह धोनीनं निवृत्ती घेतली तर तो एकाच कारणामुळं घेऊ शकतो ते कारण म्हणजे धोनीचा फिटनेस असं म्हटलं होतं.  


संबंधित बातम्या : 


RCB vs KKR: रिंकू सिंगच्या त्या गोष्टीवरुन विराट कोहली नाराज; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ नक्की पाहा!


 Travis Head: ट्रेव्हिस हेडची वादळी खेळी; पण सुरेश रैनाचा रेकॉर्ड अजूनही कायम, 10 वर्षांपूर्वीचा पराक्रम!