Bank FD Rates : दिवसेंदिवस गुंतवणुकीचं (Investment) महत्व वाढत आहे. भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक करणं महत्वाचं आहे. आत्तापासून गुंतवणूक केल्यास तुम्हाला भविष्यात मोठा परतावा मिळू शकतो. मात्र, गुंतवणूक करताना दोन गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. एक म्हणजे तुमची ठेव सुरक्षीत आहे का? आणि दुसरं म्हणजे तुमच्या ठेवीवर परतावा किती मिळतोय? या दोन गोष्टींची खबदारी घेणं महत्वाचं आहे. तुम्हाला जर बँकेत मुदत ठेव (FD) करायची असेल तर जाणून घेऊयात कोणत्या बँकेत FD वर किती व्याजदर आहेत. 


ग्राहकांनी बँकेत पैशांची गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या बँकेत किती व्याजदर मिळतो याची माहिती घेणं गरजेचं आहे. इतर बँकांची तुलना करता कोणत्या बँकेत जास्त व्याजदर मिळतो, हे पाहणं महत्वाचं आहे.  देशातील प्रमुख असणाऱ्या SBI, ICICI बँक आणि HDFC बँकामध्ये FD वर किती व्याज मिळते, त्याबाबतची माहिती पाहुयात. , 


बँक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, SBI, HDFC बँक आणि ICICI या बँकेमध्ये FD वर चांगला परतावा मिळतो. 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवीवर या बँकांमध्ये 7.75 टक्के व्याज मिळते. तर HDFC बँक आणि ICICI या दोन बँक वार्षिक FD वर  7.75 टक्के व्याज देतात. 


कोणत्या बँकेत किती दिवसासाठी किती दर


HDFC बँक  


15 ते 29 दिवसासाठी - 3 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 टक्के
90 ते 6 महिने - 4.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5 टक्के
1 वर्ष ते 15 महिने - 6.60 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.10 टक्के
21 महिने ते 2 वर्षे - 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.50 टक्के
5 वर्षे  ते 10 वर्षे - 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.75 टक्के


ICICI बँक 


15 ते 29 दिवसासाठी - 3 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 टक्के
90 ते 120 दिवस - 4.75 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.25 टक्के
1 वर्षासाठी 6.70 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.20 टक्के
3 वर्षे ते 5 वर्षे,  7 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी- 7.50 टक्के
5 वर्षे ते10 वर्षे, 7 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.50 टक्के


SBI 


7 दिवस ते 45 दिवस - 3 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 3.50 टक्के
180 ते 210 दिवस - 5.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.75 टक्के
1 वर्ष ते 2 वर्ष  - 6.80 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.30 टक्के
2 वर्षे ते 3 वर्ष - 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.50 टक्के
3 वर्षे ते 5 वर्ष - 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7 टक्के
5 वर्षे ते 10 वर्षे - सामान्य लोकांसाठी - 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 7.50 टक्के


महत्वाच्या बातम्या:


9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देणाऱ्या 5 बँका कोणत्या? गुंतवणुकीवर तुम्हाला मिळतोय मोठा लाभ