Investment : कमी कालावधीत भरघोस नफा मिळवण्यासाठी विविध बँकांकडून (Bank) योजना राबवल्या जातात. सातत्यानं काही जण नवनवीन क्षेत्रात गुंतवणूक देखील करतात. तुम्हालाही काही वर्षांत लाखो रुपयांचे मालक व्हायचे असेल तर तर तुम्हाला दररोज भारत-श्रीलंका विश्वचषक सामन्यात श्रीलंकेनं जेवढ्या धावा केल्या तेवढी रक्कम जमा करावी लागेल. काही वेळात, ही रक्कम तुम्हाला लाखो रुपयांचा मालक बनवेल. यातून तुम्हाला दुप्पट नफा होईल. 


आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात गुरुवारी सामना झाला. या  सामन्यात भारतानं श्रीलंकेचा दारुण पराभव केला. श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 55 धावात गुंडाळला. या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेसमोर 357 धावांचा डोंगर उभा केला होता. यापुढे श्रीलंकेच्या संघ केवळ 55 धावाच करु शकला.


दिवसाला 55 रुपये जमा करा, करोडपती व्हा


तुम्हाला काही वर्षांत करोडपती व्हायचे असेल, तर तुम्हाला श्रीलंकेच्या स्कोअरएवढी रक्कम जमा करावी लागेल. म्हणजे प्रतिदिन केवळ 55 रुपये जमा करावे लागतील. यासाठी तुम्ही कोणतीही पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP) निवडू शकता. 55 रुपये प्रतिदिन दराने, तुम्हाला दरमहा फक्त 1650 रुपये जमा करावे लागतील, जे 10 वर्षात 1.98 लाख रुपयांची गुंतवणूक होईल. आता SIP वर दरवर्षी 15 टक्के परतावा मोजला तर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर दुप्पट परतावा मिळेल. 10 वर्षात, ही गुंतवणूक 4.59 लाख रुपये होईल, याचा अर्थ तुम्हाला 2.61 लाख रुपयांचा थेट नफा मिळेल. साधारणपणे, हा SIP वर परतावा असतो, जरी काहीवेळा तो 20 टक्क्यांपर्यंत देखील जाऊ शकतो.


एसआयपी हा गुंतवणुकीचा सुरक्षित मार्ग 


एसआयपी ही गुंतवणुकीची सुरक्षित पद्धत मानली जाते. जरी ते शेअर बाजारातील जोखमींशी निगडीत असले तरी शेअर बाजारात थेट गुंतवणुकीपेक्षा कमी जोखमीचे आहे. यामध्ये तुमच्या निधीचे व्यवस्थापन करण्याचे काम तज्ञ करतात. SIP मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही एकदा तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.


महत्त्वाच्या बातम्या:


SIP Investment: विशिष्ट तारखेला म्युच्युअल फंडात SIP गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते?